नॅथन लायन खेळेल सलग 100 वा कसोटी सामना

Latest Marathi News| Daily Marathi News | दिनांक – २८ जून २०२३

नॅथन लायन हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आपला सलग १०० वा कसोटी सामना खेळण्यास सज्ज आहे. इंग्लंड विरूध्द ऍशेस मालिकेतील दुसरा सामना हा त्याचा सलग शंभरावा सामना ठरणार आहे.

नॅथन लायन हा स्वदेशी भूमीवर तसेच परदेशी दौऱ्यावर देखील टीमसाठी अत्यंत उपयुक्त असा गोलंदाज ठरत असतो. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याच्यावर कमालीचा विश्वास ठेवत त्याला सलग खेळवत असते.

लायन हा ऑफ स्पिनर असूनही त्याने स्वतःची कामगिरी नियमित उंचावत नेलेली आहे. कोणतीही वेगळी कला न वापरता पारंपारिक पद्धतीने त्याची गोलंदाजी असते. त्याचा फिटनेस देखील वर्षानुवर्षे कमालीचा राहिलेला आहे.

लायन हा जगभरातून सलग 100 कसोटी सामने खेळणारा सहावा खेळाडू ठरलेला आहे. एलन बॉर्डर, मार्क वॉ, सुनील गावस्कर, ब्रांडन मॅक्कुलम, एलिस्टर कूक या खेळाडूंच्या नावे अगोदर हा अजब कारनामा नोंद आहे.

Leave a Comment