Eng Vs Aus – 2nd Test Live Score | दिवसाखेर ऑस्ट्रेलिया…

ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने आला आणि इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजांनी तळ ठोकून फलंदाजी केली आणि संघाला ७३ धावांची भागीदारी केली. उस्मान ख्वाजा फक्त १७ धावाच जमवू शकला.

वॉर्नरने लबुशेनसोबत भागीदारी वाढवली मात्र त्याला एका अप्रतिम आत येणारा चेंडू टाकला गेला, त्या चेंडूवर त्याचा त्रिफळाचित झाला. टोंगने त्याचा बळी घेतला.

त्यापुढे लबुशेन आणि स्मिथ यांनी शतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. त्या दोघांनी १०२ धावा जोडल्या. संघाचा स्कोअर १९८ असताना लबुशेनचा बळी गेला. त्याने वैयक्तिक ४७ धावा केल्या.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ट्राविस हेडने अगदी तुफान फलंदाजी करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. त्याने फक्त ७३ चेंडूत ७७ धावा केल्या. त्याने त्याच्या खेळीत १४ चौकार लगावले.

हेडनंतर फलंदाजी करण्यास ग्रीन आला पण तो खातेही खोलू शकला नाही. हेड आणि ग्रीन हे बळी जो रूटने टिपले.

दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या ५ गडी बाद ३३९ धावा झाल्या होत्या. त्यामध्ये स्मिथ ८५ धावांवर आणि कॅरी ११ धावांवर नाबाद होता. जोश टाँग, रुटने प्रत्येकी २ बळी घेतले आणि रॉबिन्सनने एक बळी घेतला.

Leave a Comment