नागपंचमी – मराठी माहिती • Naag Panchami Mahiti Marathi •

प्रस्तुत लेख हा नागपंचमी (Naag Panchami) या सणाविषयी मराठी माहिती (Marathi Mahiti) देणारा लेख आहे. नागपंचमी हा सण कसा साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व या लेखात अत्यंत मुद्देसुद पद्धतीने मांडण्यात आलेले आहे.

नागपंचमी माहिती मराठी _ Naag Panchami Information In Marathi

• नागपंचमी या सणाला नागाची पूजा केली जाते. हा सण श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला साजरा केला जातो.

• नागपंचमी दिवशी शेतात नांगरणे, खणणे, कापणे अशा कोणत्याही प्रकारचे काम केले जात नाही. त्यादिवशी नागदेवतेला ईजा होऊ नये आणि त्याचे पूजन व्हावे असा हेतू त्यामागील आहे.

• कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीतून सुरक्षित वर येतात तो दिवस श्रावण शुध्द पंचमीचा होता. त्यामुळे नागपंचमी हा सण त्या दिवशी साजरा केला जातो अशी मान्यता आहे.

• नागपंचमी सणाला नागाच्या मूर्तीला किंवा खऱ्या नागाला दुधाचा अथवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.

• शेष, वासुकी, कम्बल, धृतराष्ट्र, पद्मनाभ तक्षक, शंखपाल आणि कालिया या आठ प्रकारच्या नागांची या दिवशी पूजा केली जाते. तसेच भविष्योत्तर पुराणात मणिभद्रक, ऐरावत, कार्कोटक आणि धनंजय या इतरही नागांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

नागाचे महत्त्व –

• नाग हा वेगवेगळ्या रंगांचा असतो. त्यामध्ये करडा, हिरवा, पिवळा, काळा असेही रंग आढळतात. नागाच्या बचावासाठी प्रकृतीनुसार त्याच्या तोंडात विषाची निर्मिती होत असते.

• नागाचे विष हे मनुष्यासाठी धोकादायक असल्याने नागापासून माणूस विशेष सावधानता बाळगत असतो. ही सावधानता नागपंचमी सणाला देखील दिसून येते. काही ठिकाणी गारुडी नागाला घेऊन येतात तेव्हा अनेक लोक नागापासून दूर – दूर राहून पूजन करतात.

• मनुष्याची ध्यानक्षमता नाग ओळखू शकतो. जो व्यक्ती ध्यान आणि अध्यात्मिक गती प्राप्त करत असतो तेव्हा नाग तेथे उपस्थित होत असतात. म्हणजेच अध्यात्मिक संवेदनशीलता ही नागात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असल्याने मनुष्याने त्याला पूजनीय मानले.

• तसेच अध्यात्मिक प्रक्रियेत कुंडलिनी ऊर्जा हे नागाचेच प्रतिक मानले गेले आहे. नाग हा कितीतरी अर्थाने मानवाच्या संवेदनशीलतेला जवळीक साधत असल्याने प्राचीन काळापासून मनुष्य त्याची पूजा करत आलेला आहे.

स्त्रियांसाठी नागपंचमी सण _

• नागपंचमी सणाच्या निमित्ताने भाऊ आपल्या विवाहित बहिणीला तिच्या माहेरी घेऊन जात असतो. नागपंचमीला स्त्रिया उपवास पकडतात तसेच हातावर मेंदी देखील काढतात.

• घराची साफसफाई केली जाते. घराच्या अंगणात सुंदर अशी रांगोळी काढली जाते. भिंतीवर तसेच अंगणात नागाची चित्रे काढली जातात. सणावेळी जिवंत नाग, वारूळ अथवा नागाच्या मूर्तीची पूजा केली जाते. नागपंचमी दिवशी पुरणपोळीचे गोड जेवण बनवले जाते.

• सणादिवशी नागदेवतेची पूजा झाल्यानंतर स्त्रिया झाडाला दोर बांधून झोके घेतात. झिम्मा – फुगडी, पिंगा असे खेळ खेळतात तसेच फेर धरून नाचतात. उखाणे, गप्पा, गाणी, नृत्य अशा विविध प्रकारे स्त्रिया या दिवशी व्यक्त होत असतात.

तुम्हाला नागपंचमी – माहिती मराठी (Naag Panchami Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment