गणेश चतुर्थी – मराठी माहिती | Ganesh Chaturthi Marathi Mahiti |

गणेश चतुर्थीचा उत्सव हा सर्वांचा आवडता उत्सव आहे. भगवान गणेशाची प्रतिष्ठापना करून त्याची दहा दिवस मनोभावे पूजा केली जाते. अशा या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) उत्सवाविषयी आपण या लेखात मराठी माहिती (Marathi Mahiti) जाणून घेणार आहोत.

गणेश चतुर्थी – मराठी माहिती • Ganesh Chaturthi Information in Marathi •

• गणेश चतुर्थी हा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्वपूर्ण उत्सव आहे. विनायक, एकदंत, गणपती, गणेश, विघ्नहर्ता, गणराया – अशा विविध नावांनी परिचित असलेल्या गणपतीची पूजा या उत्सवात केली जाते.

• पूजास्थळी गणपतीच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणेशाच्या पायांत जास्वंद पुष्प, कुंकू, सुपारी, दुर्वा आणि निवेदनासाठी मोदक ठेवतात. त्यानंतर मंत्रे, स्तोत्रे, आरती आणि विधिमान पूजा केली जाते.

• श्री गणेश चतुर्थी हा उत्सव भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीला साजरा केला जातो. ते एक धार्मिक व्रत सुद्धा आहे.

• गणपतीच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. या उत्सवाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, गणेशाची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते.

• गणपती देवाला मोदक खूप आवडतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. पूजनाचे ताट त्यासमोर मांडले जाते. जास्वंदीचे फुल आणि दुर्वा यादेखील मूर्तीसमोर वाहिल्या जातात.

• “गणपती बाप्पा… मोरया” असा गणपतीचा नामघोष करत आरतीला सुरुवात होत असते. प्रत्येक कुटुंबाच्या मान्यतेनुसार आणि गरजेनुसार गणपतीच्या मूर्तीचे पूजन केले जात असते.

• गणपती हा सर्व गणांचा अधिपती आहे असे म्हटले जाते. त्याच्या स्वरूपाचे रूपांतर होत गेलेले आहे आणि पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. गणपती शेजारी आपण उंदीर बसलेला पाहतो. त्याचे कारण म्हणजे गणपतीचे वाहन हे उंदीर आहे.

• भारतीय लोक कौटुंबिक स्तरावर गणेशाची पूजा करतच असतात परंतु सामाजिक स्तरावर एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव देखील साजरा केला जातो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.

• लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात १८९४ साली केली. त्यावेळी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जात असत.

• आधुनिक महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे स्वरूप बदललेले आपण पाहतो. सध्या आधुनिकता आणि तंत्रज्ञान यांचा पुरेपूर वापर गणेश उत्सवात केला जातो.

• सार्वजनिक स्तरावर डेकोरेशन, डीजे सिस्टीम, स्पीकर्स, मोठ्या उंचीची गणेश मूर्ती अशा बाबी वापरात आणल्या जातात. गणेश आगमन आणि गणेश विसर्जन अशा वेळी सर्रास मोठ्या गाजावाजात बाप्पाची मिरवणूक काढली जाते.

तुम्हाला गणेश चतुर्थी – मराठी माहिती (Ganesh chaturthi Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment