स्वातंत्र्याची ७६ वर्षे…

१५ ऑगस्ट १९४७ ही तारीख भारतीय भूमीत स्वातंत्र्याची सकाळ घेऊन आली. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि एका नवीन पर्वाची सुरुवात झाली जेथे भारताला जगभरात स्वतःचे स्थान निर्माण करावयाचे होते तसेच दुसऱ्या बाजूने अस्मितेची गमावलेली संवेदना शोधायची होती.

स्वातंत्र्य म्हणजे इंग्रज राज्य करत होते त्यानंतर आपणच आपले राज्यकर्ते झालो असा इतिहास आहे. लोकशाही निर्माण झाली आणि शासन सुरू झाले. इंग्रजांनी संस्कारित केलेली डोकी बाजूला सारून भारतीय व्यवस्थेनुसार इथली संस्कृती जपून सामाजिक स्थिरता आणण्याचा प्रयत्न हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केला गेलेला आहे.

शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक बाबींमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आपले भारत राष्ट्र ही भावना जोपासण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. कला – क्रीडा क्षेत्र हे नेहमीच भारतीयत्वाची जाणीव जपत आलेले आहे.

स्वातंत्र्याला फक्त राजकीय दृष्टीकोन न देता आपणांस इतर पैलू देखील समजून घेणे आवश्यक आहे. सध्या औद्योगिक विकास हाच प्रगतीचे मापदंड ठरवत आहे. त्यामुळे उद्योगातील स्वातंत्र्य ही बाब आपल्याला अन्य देशांच्या तुलनेत अधिक काळ राबवावी लागेल.

भारत भूमीच्या हजारो वर्षांच्या इतिहासात सनातन संस्कृती टिकून राहण्यामागे येथील शेतकीय व अध्यात्मिक ज्ञान कारणीभूत आहे. प्रत्येक पिढीत शेतकी व अध्यात्मिक ज्ञान व कला पुढे पोचवली जात असते. भारत स्वतंत्र नसतानाही या दोन बाजूंनी भारत कधीही मागे पडलेला आढळत नाही.

भारत स्वतंत्र झाल्यापासून औद्योगिक व वैज्ञानिक क्षेत्रात प्रगत झालेला आढळून येतो. गेली ७६ वर्षांत ज्या तीन पिढ्यांची मेहनत आहे ती सध्या आपल्याला तंत्रज्ञान विकासात दिसून येत आहे.

भारत हे एक महान राष्ट्र म्हणून कायम टिकून राहावे आणि वेळोवेळी सामाजिक, राजकीय व पर्यावरणीय समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करता यावी यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

आधुनिक पिढीसाठी योगा व ध्यान जीवनपद्धती ही संपूर्ण जगाला भारताकडून मिळालेली प्रेरणाच आहे ज्यामुळे संपूर्ण मानवजात एका अप्रतिम, आनंदी आणि शांत आयुष्याला प्राप्त करू शकेल आणि अध्यात्मिक विकास घडवून आणू शकेल.

Leave a Comment