कोरोना विषाणूमुळे सर्वांना मास्क लावणे अनिवार्य झाले आहे. विद्यार्थी, पालक, नागरिक, लहान-मोठी मुले, असे सर्वच जण आपल्याला मास्क लावून बाहेर पडताना दिसतात. अशा या मास्कचे आत्मकथन विद्यार्थ्यांना मी मास्क बोलतोय या निबंधात (Mi Mask boltoy Marathi Nibandh) करावयाचे असते.
मास्कची आत्मकथा | मी मास्क बोलतोय मराठी निबंध
आत्ताच मला विक्रीसाठी घेऊन आलेले आहेत. आता तर मी प्रत्येक दुकान व मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. कोरोना विषाणू पसरू लागल्यापासून माझा वापर नियमित सुरू झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा आणि वेगवेगळ्या रंगात मी प्रत्येकाच्या तोंडावर असतोच. मी कोण?.. अरे मी मास्क बोलतोय!
पूर्वी मास्क वापरणे हे रोजच्या सवयीत नव्हते. मास्कचा वापर फक्त वैद्यकीय क्षेत्रात होत असे. आता मात्र कोरोना विषाणू आहे तोपर्यंत माझा वापर तुम्हाला करावाच लागेल. तुम्हाला कोविड – 19 रोगापासून बचावासाठी मला वापरणे बंधनकारक असणार आहे.
कोरोना जसजसा वाढत गेला तसे समजले की तो संसर्गजन्य रोग आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्काने आणि स्पर्शाने तो पसरू शकतो. तसेच हवेवाटे पसरण्याची शक्यता देखील जास्त आहे. ही समस्या गंभीर असल्याचे जाणून डॉक्टरांनी सर्वांना मास्क वापरणे आणि नियमित हात धुणे हे नियम पाळण्यास सांगितले.
माझा नियमित वापर केल्यास तुम्हाला कोणताही विषाणू संसर्ग पकडणार नाही. गर्दीच्या ठिकाणी माझा वापर केल्यास तुम्ही कोरोना बाधित होणार नाही. हवेतील विषाणू उघड्या डोळ्यांनी दिसत नसल्याने माझा वापरच तुम्हाला रोगराईपासून वाचवू शकतो.
दिवसातले चोवीस तास मला परिधान करणे आवश्यक नाही. एकटे असताना मोकळा श्वास घेण्यासाठी मास्क काढू शकता. तसेच कष्टाचे काम करताना माझा वापर श्वसन प्रक्रियेला अडथळा ठरणार नाही अशा प्रकारे करा. तसेच नियमित स्वच्छ मास्क वापरणे गरजेचे आहे.
माझी निर्मिती आणि वापर अचानक वाढला असल्याने वेगवेगळ्या डिझाईनचे मास्क बाजारात उपलब्ध झाले. काहींचा वापर हा अतिघातक होता. त्यातून विषाणू आत प्रवेश करू शकत होते. त्यामुळे स्वतः डॉक्टरांनी सुचवलेले स्वच्छ आणि अपारदर्शक मास्क वापरणे अनिवार्य झाले.
घराबाहेर पडले की मास्क वापरणे हा आता नियमच आहे. शाळेतील विद्यार्थी, कामावर जाणारे लोक, इतरत्र फिरणारे लोक सर्वांनीच मास्क लावून असणे गरजेचे आहे. पोलिस यंत्रणा मास्क न वापरणाऱ्यांना दंड ठोठावत आहे.
स्वतः आजारी पडल्यास नक्कीच माझा वापर करा. दवाखान्यात गेल्यावर आपण इतर आजारी व्यक्तींच्या संपर्कात येऊ शकतो त्यामुळे अति संवेदनशील ठिकाणी स्वच्छ आणि सुयोग्य पद्धतीने मला वापरा. काहीजण मला नाका खाली ठेवतात. ती पद्धत चुकीची आहे. संपूर्ण नाक आणि तोंड झाकेल अशा प्रकारे मला परिधान करा.
जोपर्यंत कोरोना संक्रमण आहे तोपर्यंत मी नियमित तुमच्या सोबत असणारच आहे. त्यानंतरही असणार, पण माझा वापर मर्यादित असेल. माझे फायदे आणि योग्य वापर जाणून घेऊन नियमित स्वच्छ मास्क वापरणे हेच तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी हितावह ठरेल.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला मी मास्क बोलतोय हा मराठी निबंध (Mi Mask boltoy Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
what a good autobiography nice