आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गायक अॅकाॅन गाणार मराठीत?

अॅकाॅन हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा असा जगप्रसिद्ध गायक. त्याने गायलेले ‘स्मॅक दॅट’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. त्याचे जगभरात करोडो फॅन्स आहेत. तसेच या जगप्रसिद्ध गायकाने बॉलीवूडमधील ‘छम्मक छल्लो’ या गाण्यासाठी सुद्धा आवाज दिला होता. आणि ते गाणं सुद्धा सुपरहिट ठरलं होत. आणि आता तो मराठीत आपल्या आवाजाची जादू चालवायला तयार झाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अॅकाॅन लवकरच एक मराठी गाणं गाणार असल्याची शक्यता आहे. जगभरात महागड्या गायकांपैकी एक अॅकाॅन आहे. आणि तो मराठीत गाणार म्हटल्यावर मराठीतील त्याच्या फॅन्स साठी हि एक पर्वणीच असणार आहे.

मराठीमधले आघाडीचे व्यावसायिक अक्षय गिरमे हे एका मराठी संगीत अल्बमसाठी अॅकाॅनशी याबाबतीत चर्चा करत आहेत. याबाबतीत अक्षय म्हणाले,”इतक्या लवकर याबाबतीत मी काही सांगू शकत नाही. पण अॅकाॅनशी या संगीत अल्बमसाठी बोलणी सुरु आहेत. सर्व गोष्टी जर नीट जुळून आल्या तर लवकरच या अल्बमच्या शूटिंगला सुरुवात होऊन २०१९ च्या अखेरीस हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

अक्षयच्या गिरमे यांच्या बोलण्यानुसार या गाण्याचा व्हिडिओ लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात शूट होईल. तसेच ‘गल्ली बॉय’ या सिनेमातील एक रॅपर सुद्धा या अल्बममध्ये झळकण्याची शक्यता आहे. म्हणजे यामध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय रॅपर्स ची जुगलबंदी पाहायला मिळेल.

अजून तरी ऑफिसिअल घोषणा झाली नाही परंतु हा प्रोजेक्ट होण्याची दात शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच याविषयी अधिक माहिती बाहेर येईलच पण तूर्तास अॅकाॅन हा मराठीत गाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

Leave a Comment