gayatri gupta
Image Credit-Samayam Telugu

बिग बॉस हा नेहमी वादग्रस्त शो राहिला आहे. बिग बॉस कोणत्याही भाषेतील असो हिंदी, मराठी, तेलगू
किंवा तमिळ प्रत्येक सीझन मध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी हा शो वादग्रस्त ठरला आहे.

अभिनेत्री गायत्री गुप्ता हिने केलेले बिग बॉस वरील आरोप वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.अभिनेत्री गायत्री गुप्ता हिने बिग बॉस संयोजकावर हैदराबादमधील रायदुर्गम पोलिस स्टेशन मध्ये फसवणूक व आपत्तिजनक प्रश्न विचारणे अशी फिर्याद नोंदवली आहे. शो मध्ये सहभागी होण्याआधी बिग बॉस संयोजकांनी अभिनेत्री गायत्री गुप्ता हिला तू १०० दिवस सेक्स शिवाय राहू शकतेस का असा आपत्तिजनक प्रश्न विचारला एवढाच कमी की काय तू बिग बॉस ला कसा संतुष्ट करशील.? असे प्रश्न विचारून बिग बॉस संयोजकानी वाद ओढवून घेतला आहे.

अभिनेत्री गायत्री गुप्ता ही तिने सुरू केलेल्या कास्टींग काऊच विरोधातील भूमिकेमुळे प्रकाश झोतात आली होती. आता तिने बिग बॉस संयोजकांवर अश्लील बोलणे हा आरोप लावलेला आहे व त्यासंबंधी पोलिस केस सुध्दा केली आहे.गायत्री चा असा म्हणणं आहे की संयोजकांनी तिला असा विचारला की तू १०० दिवस सेक्स शिवाय राहशील काय.?

कुत्रिम पाऊस म्हणजे नक्की काय? येत्या काही दिवसात मराठवाड्यात बरसणार.

गायत्री ने आपल्या फिर्यादी मध्ये असा म्हणलं आहे की तीन संयोजकांनी तिला शो मध्ये स्पर्धक म्हणून निवड झाल्याचे सांगितले त्यानंतर त्याबद्दलचा तसा करार सुध्दा त्यांच्यामध्ये झाला होता पण नंतर त्यांनी तिला असे सांगितले की तुझी निवड झालेली नाही आणि तिने असा आरोप लावला आहे की त्यानंतर आयोजकांनी तिला विचारला की तुझी जर बिग बॉस मध्ये निवड करायची असेल तर तू बिग बॉस का संतुष्ट कसा करशील?

या सगळ्या गंभीर गोष्टी घडल्यानंतर अभिनेत्री गायत्री गुप्ता हिने बिग बॉस संयोजकावर हैदराबादमधील
रायदुर्गम पोलिस स्टेशन मध्ये फसवणूक व आपत्तिजनक प्रश्न विचारणे अशी फिर्याद नोंदवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here