कुत्रिम पाऊस
image credit- DNA India

यावर्षी महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी – जास्त राहिलं आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात अजून पाऊस सुद्धा पडला नाही .मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पाऊस लांबणीवर पडला असून शेतकरी  हवालदिल झाले आहेत.

अशावेळी नेहमी चर्चा होत असते ती कुत्रिम पाऊसाची. पण कुत्रिम पाऊस म्हणजे काय? , कुत्रिम पाऊस कसा पडला जातो? याची माहिती खूप कमी लोकांकडे असते. आज हीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कुत्रिम पाऊस म्हणजे काय ?

ढगांमध्ये असणारी बाष्पपाची क्षमता , तापमान , वाऱ्याची दिशा व वेग हे  चार घटक  सामन्याता पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असतात .पण यातील एका जरी गोष्टीचा असमतोल झाला तरी  पाऊसाची शक्यता कमी असते. अशावेळी ढगांमध्ये असणारया बाष्पाचे वाढवल जात व योग्य त्त्या तापमानावर थंड केला कि त्त्याचे रुपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होते. याचाच अर्थ असा कि काळ्या ढगांवर रसायने फिरवून पाऊस पाडणे म्हणजे कृत्रीम पाऊस होय. पाउसाच्या थेंबाची जेव्हा नैसर्गिकरीत्या निर्मिती होणे बंद होत असते तेव्हा अशा कृत्रीम पाउसाद्वारे पाउसाच्या थेंबांची निर्मिती केली जाते. तसेच या पद्धतीचा उपयोग हा गारांचा आकार कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो.

शोध आणि इतिहास

कृत्रीम पाऊस पाडण्याची सुरुवात हि २० व्या शतकात अमेरिकेत झाली. त्यानंतर इस्राईल, रशिया, भारत, चीन , आफ्रीका व युरोप मधल्या काही देशांनी कृत्रीम पाऊस पडण्यासाठी प्रयोग केले आहेत .

भारतामध्ये कृत्रीम पाउसाचा इतिहास सुरु होतो सन १९८३ ला जेव्हा तामिळनाडू सरकारने दुष्काळ निवारणासाठी कृत्रीम पाउसाचा प्रथम प्रयोग केला त्यानंतर १९८४ ते १९८७ व १९९३ ते १९९४ ला सुद्धा कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी तामिळनाडू सरकारने प्रयोग केले.

सन २००३ व २००४ साली कर्नाटक सरकारने सुद्धा कृत्रीम पाऊसाचे प्रयोग केले तर २००४ साली महाराष्ट्र सरकारने सुद्धा कृत्रीम पाउसाचा प्रयोग अमेरिका स्थित कंपनी द्वारे करण्यात आले. तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने २००८ साली १२ जिल्ह्याच्या दुष्काळ निवारणासाठी कृत्रीम पाउसाचा प्रयोग केला होता.

अलीकडच्या काळात हि असले प्रयोग २०१० व २०११ साली तेलंगाना, महाराष्ट्र , कर्नाटक या राज्यातील दुष्काळ ग्रस्थ जिल्हामध्ये हे प्रयोग करण्यात आले. सध्यपरिस्थितीत बदलेले नियम व कोर्टाची असणारी बंधने यामुळे कृत्रीम पाऊसचे प्रयोग मान्सून मध्ये करणे शक्य नाही. तरी यावर्षी महाराष्ट्रात मान्सून मध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे सरकारने कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार ला मान्सून मध्ये कृत्रीम पाऊस पाडण्याची परवानगी देते का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ३० कोटींचा निधी

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या संदर्भात सरकारच्या वतीने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृत्रिम पावसासाठी औरंगाबाद येथे डॉप्लर रडार यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मराठवाड्याच्या ज्या ठिकाणी ढगांची दाटीवाटी होताना दिसत असेल तिथे योजनाबद्ध पध्दतीने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारच्या वतीने सगळ्या प्रकारची तयारी करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here