FD आणि RD म्हणजे काय –

FD आणि RD गुंतवणूक काय असते आणि त्यामधील फरक काय असतो याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.

आपल्याकडे बऱ्यापैकी पैसा जमा झाल्यास आपण नेहमीच गुंतवणुकीचा पर्याय निवडतो. त्यामार्फत आपण आपली जमा रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करतो.

गुंतवणुक करतेवेळी विविध पर्यायांपैकी FD आणि RD असे दोन पर्याय आपल्यासमोर दिसतात. त्यातील फरक समजून घेतल्यास आपल्याला योग्य वाटेल अशी गुंतवणूक आपण करू शकतो.

एफडी आणि आरडी म्हणजे काय • FD & RD meaning in Marathi •

एफडी म्हणजे काय –

• एफडी – फिक्स डिपॉझिट (Fix Deposit)

फिक्स म्हणजे निश्चित आणि डिपॉझिट म्हणजे जमा. निश्चित कालावधीसाठी एखादी ठराविक रक्कम जमा केली जाते. ती रक्कम निश्चित व्याजदरावर बँकेत जमा केली जाते. त्याला FD (Fix Deposit) असे म्हटले जाते.

आपल्याला निश्चित आणि सेविंगपेक्षा जास्त व्याजदर मिळत असल्याने आपण नक्कीच एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो.

आपण जेवढ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू तेवढ्या कालावधीमध्ये ती रक्कम आपण काढू शकत नाही. कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला निश्चित व्याजदर मिळवून ती रक्कम काढता येते.

आरडी म्हणजे काय –

• आरडी – रिकरींग डिपॉझिट (Recurring Deposit)

आरडी गुंतवणुकीत आपण प्रत्येक महिन्यात एक निश्चित रक्कम जमा करत असतो. आरडीचा कालावधी संपला की आपल्याला व्याजदरासहित ती रक्कम परत मिळत असते. प्रत्येक बँकेत आरडी अकाऊंट खोलण्यासाठी रक्कम वेगवेगळी असू शकते.

एफडी निवडावे की आरडी –

आपली जशी गरज असेल आणि आपण कशा प्रकारे रक्कम जमा करू शकतो यावर एफडी किंवा आरडी ही उत्तम ठरत असते. आपल्याकडे जास्त रक्कम जमा असल्यास आपण त्यातील एक निश्चित रक्कम एकाचवेळी एफडी करू शकतो.

दुसऱ्या स्थितीत जर आपल्याकडे नियमितपणे रक्कम जमा होत असेल तर अशावेळी आरडी हा पर्याय निवडला जातो. महिन्याला येणाऱ्या रक्कमेतून काही रक्कम आपण आरडीमध्ये प्रत्येक महिन्याला जमा करू शकतो.


तुम्हाला एफडी आणि आरडी म्हणजे काय (FD & RD meaning in Marathi) हा लेख आवडला असेल तर तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लगेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करुन आपले मत नोंदवा…

Leave a Comment