भारत विश्र्वचषक स्पर्धेत पराभूत होण्याची प्रमुख कारणे –

2023 विश्वचषकात सर्व परिस्थिती भारताच्या बाजूने असतानाही भारत विश्वचषक जिंकू शकला नाही याचे दुःख सर्व भारतीयांना आहेच. परंतु सामना ज्या अर्थी एकतर्फी झाला त्यामुळे अनेक कारणे समोर येतायेत ज्यांमुळे भारत हरला असावा असे तर्कवितर्क लावले जात आहेत.

अशा सर्व कारणांची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. एक सखोल चर्चा आणि रोहित शर्माच्या टीमने घेतलेले निर्णय आणि खेळाडूंची सामन्यातील मनःस्थिती याबद्दल सर्व बाबींची चर्चा आपण करणार आहोत.

भारत पराभूत होण्यामागची प्रमुख कारणे –

नाणेफेक –

नाणेफेक होताच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक ऑस्ट्रेलियन टिमच्या बाजूने आल्याने त्याचा पुरेपूर फायदा गोलंदाजांनी उठवला. खेळपट्टी संथ असल्याने भारतीय फलंदाज पॉवरप्लेनंतर धावगती वाढवू शकले नाहीत.

कोहलीच्या विकेटनंतर भारताची संथ फलंदाजी –

रोहितने नेहमीप्रमाणे धाकड फलंदाजी (47 धावा) करत आपली उपस्थिती जाणवून दिली. परंतु थोड्या अंतराने लगेच रोहित आणि श्रेयसची विकेट गमावल्याने धावगतीला लगाम लागला. त्यानंतर कोहली व राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

कोहलीची (54 धावा) विकेट गेल्यानंतर मात्र धावगती खूपच संथ झाली आणि भारत सर्वबाद 240 धावाच बनवू शकला. फलंदाजी करताना भारतीय फलंदाज अतिशय बचावात्मक पवित्र्याने खेळल्याने मोठी धावसंख्या उभारणे अशक्य झाले.

• गोलंदाजी क्रम आणि दवबिंदू –

भारताने संपूर्ण विश्वचषकात बुमराह व सिराज या गोलंदाजांनी सुरुवातीचा मारा केला होता. परंतु या सामन्यात बुमराहसोबत शामी गोलंदाजीला आला. पहिल्या पॉवरप्लेमध्ये 3 बळी टिपण्यात यशस्वी ठरलेली गोलंदाजी सामन्याच्या अखेरीस चौथा बळी घेऊ शकली.

सुरुवातीच्या स्पेलनंतर दव पडल्याने सिराज स्विंग गोलंदाजीने प्रभावी ठरला नाही. जडेजा व कुलदीप देखील स्पिन गोलंदाजीने फलंदाजांना बाद करण्यात अयशस्वी ठरले. तसेच बुमराह व शामी हे देखील दुसऱ्या – तिसऱ्या स्पेलमध्ये यशस्वी ठरले नाहीत.

Leave a Comment