Essay on Parrot in Marathi | आजच्या निबंधाचा विषय – पोपट!

लाल लाल चोचीचा हिरवा हिरवा पोपट आवडेल का रे तुला ?
हो हो हो…
पेरू आवडे ज्याला मिरची आवडे ज्याला असा छान छान पोपट आवडेल का रे तुला ?
हो हो हो…
मिठू मिठू बोले ज्याचे इवलेसे डोळे असा गोंडस हा पोपट आवडेल का रे तुला ?
हो हो हो…

ही कविता जरी लहान मुलांची असली तरी त्याचा संदर्भ प्रत्येकाला येईलच. एकदम सुंदर दिसणारा पोपट हा पक्षी सर्वांचं लक्ष्य वेधून घेत असतो. असा हा पोपट खूप जणांचा आवडता पक्षी देखील आहे. पोपट हा पाळीव पक्षी आहे. त्याला पकडून जर सांभाळलं तर तो सर्वांचं आकर्षण केंद्र बनतो.

पोपट संपूर्ण जगात आढळणारा पक्षी आहे. मध्यम आकाराचा हा पक्षी दिसला तरी मनात किती आनंद होतो ! भारतात तर लहान असताना जवळजवळ सर्वांनीच कधीना कधी पोपटाचे चित्र काढलेले आहेच. पोपट हा नर तर मैना ही मादी जात म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते.

प्रत्येक देशात पोपटाच्या विविध प्रजाती आढळतात. सर्वाधिक प्रजाती न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. भारतातील पोपट हा साधारणतः हिरव्या रंगाचा असतो. बाकीच्या देशात हिरव्याव्यतिरिक्त पांढरा, लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचे पोपट आढळतात. आपण फक्त हिरव्या रंगाचा पोपट बघितल्यावर आनंदी होतो. मग बाकीच्या रंगाचे पोपट दिसल्यावर तर आपला आनंद गगनात मावनार नाही.

पोपटाची शरीर रचना ही मध्यम आकाराची आणि सुडौल असते. त्याची चोच वाकडी आणि लाल रंगाची असते. त्याच्या पायाला चार नख्या असतात. काही पोपटांच्या मानेभोवती काळे वलय असते. पोपट हा फळे, बियाणे, मिरच्या खातो. काही पोपट हे मांसाहारी देखील असतात. ते लहान कीटक पकडून खातात. तरी पेरू हेच पोपटाचे आवडते फळ आहे.

पोपटाचे वयोमान हे लगबग २० वर्ष असते. पोपटाच्या प्रजातींपैकी लहान, मध्यम आणि मोठे असे वर्गीकरण करता येईल ज्यामध्ये लहान आकाराची जात ही भारतात आढळते. पोपट हा पक्षी सर्वत्र आढळतो. परंतु काही क्षेत्रात शहरीकरण आणि औद्योगीकरण अति प्रमाणात झाल्याने तिथे पोपट आढळत नाही.

प्राचीन काळापासून माणूस पोपटाला पाळत आला आहे त्याचे कारण म्हणजे त्याचे बोलणे. पोपट मिठू मिठू बोलतो असे आपण म्हणतो. त्याला शिकवेल ते शब्द तो बोलू शकतो. भारतात त्याला पूर्वी राम – राम बोलायला शिकवले जायचे जेणेकरून कुठले पाहुणे आले तर तो त्यांना राम – राम म्हणेल. पोपट हा थव्यात राहणारा पक्षी आहे. तो अन्न शोधताना देखील एकटा जात नाही. असा हा पोपट सर्व लहान तसेच मोठ्या व्यक्तीचे देखील आकर्षण आहे.

Leave a Comment