दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर _ ऑस्ट्रेलिया विरूध्द इंग्लंड कसोटी _

ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशीचा खेळ अत्यंत रंगतदार अवस्थेत संपला. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या दिवशीच्या ३३९/५ या धावसंख्येवरून खेळाला सुरुवात केली.

स्मिथने १८४ चेंडुंचा सामना करत शानदार ११० धावा काढल्या. तो जोश टाँगचा बळी ठरला. इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव ४१६ धावांवर संपुष्टात आला. रॉबिन्सन आणि टाँगने प्रत्येकी तीन बळी घेतले.

इंग्लंडने आपल्या डावाची भक्कम सुरुवात करत ९१ धावांची सलामी दिली. इंग्लंडचा पहिला बळी क्रॉलीच्या रुपात गेला. त्याने ४८ धावा जमवल्या. त्यानंतर आलेल्या ओली पोप आणि सलामीवीर बेन डकेटने दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. संघाचा स्कोअर १८८ असताना पोप ग्रीनचा बळी ठरला.

लगेच २०८ धावसंख्येवर सलामीवीर डकेट ९८ धावांवर बाद झाला. त्याचे शतक फक्त २ धावांनी हुकले. इंग्लंडचा मुख्य फलंदाज जो रूट या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो १० धावांवर असताना स्टार्कने त्याला स्मिथकरवी झेलबाद करवले.

दिवस संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या २७८/४ अशी होती. स्टोक्स १७ तर ब्रुक ४५ धावांवर नाबाद खेळत होते. तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ऑस्ट्रेलिया इंग्लंडला लवकरात लवकर ऑलआऊट करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल तर इंग्लंड मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.

Leave a Comment