youtube kids

युट्युबची वाढती लोकप्रियता पाहून आज सर्वजण थक्क होत आहेत. कुठेही बसल्या बसल्या मनोरंजन करून देणारे एकमेव अॅप म्हणजे युट्यूब. युट्यूब वर होणारे सर्व सर्चेस आता वेगवेगळ्या शाखेत येऊ लागले आहेत. युट्यूब त्याच शाखा ॲप्सच्या स्वरूपात काढू लागले आहे.     

युट्युबवर जर सर्च करणाऱ्यांची संख्या बघितली तर, लहान मुलांसाठी सर्च हे सर्वात जास्त आहेत आणि एकच व्हिडिओ वारंवार बघितला जात असल्याने अशा व्हिडिओचे व्ह्यूज झपाट्याने वाढतात. पालक व मुल असे दोन्ही या कॅटेगरीत येतात जे सारखे सारखे एखादा व्हिडिओ सर्च करत असतात.   

ज्या लहान मुलांना काही समजत नाही त्यांना त्यांचे पालकच कार्टून्स, ऍनिमेशन फिल्म,लहान मुलांचे खेळ, असे सर्च करून बघायला देतात मग लहान मूल मज्जा म्हणून तासनतास तेच बघत राहते. त्यामुळे एखादा व्हिडिओ जर आवडला तर त्याचा चैनल सबस्क्राईब करून ठेवला जातो. याचाच फायदा म्हणून तो एकच व्हिडिओ असंख्य वेळा बघितला जातो. त्यामुळे सर्वात जास्त व्ह्यूज लहान मुलांच्या कॅटेगरीत युट्यूब वर असतात.

याचाच विचार करून “यूट्यूब किड्स” हे ॲप बनवले गेले आहे. हे अॅप खूपच यूजर फ्रेंडली असून ते लहान मुलांना देखील सहज हाताळता येऊ शकते.  लहान मुलांचे विश्व हे कल्पनांचे विश्व असते त्याची पुरेपूर काळजी या ॲपद्वारे घेण्यात आले आहे. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांसाठी हे ॲप यूज करून पहावे.

या अॅप ची काही वैशिष्ट्ये-

१. प्रत्येकाच्या आवडीनुसार कॅटेगरी-मुलाला कुठली कॅटेगरी आवडते त्यानुसार तो तशी कॅटेगरी निवडू शकतो. तो आवडेल ते व्हिडिओ पाहू शकतो जसे की गेम्स व्हिडिओ असतील, आवडते कार्टूनचे व्हिडिओ असतील, कविता किंवा rhymes असतील, ॲनिमेशन फिल्म असेल, किंवा शैक्षणिक व्हिडिओ असतील, या सर्व कॅटेगरीज वेगवेगळ्या करून एकाच अॅपमधे त्यांचा समावेश केल्याने मुलांचे जग आणखीनच सुंदर झाले आहे.

२. पॅरेण्टल कंट्रोल-पालकांना त्यांचा मुलगा कोणत्या वयात आहे यानुसार ते parental control ठेऊ शकतात. प्रीस्कूल, यंगर आणि ओल्डर अशा तीन कॅटेगरी या parental कंट्रोलमध्ये मिळतात त्यानुसार पालक लहान मुलाने काय बघावे, यावर नियंत्रण राखू शकतो. प्रीस्कूल ही कॅटेगरी चार वर्षाखालील मुलांसाठी आहे. यंगर ही कॅटेगरी पाच ते सात वर्ष वयोगटातील आहे. तर ओल्डर ही कॅटेगरी आठ ते बारा वर्षे या वयोगटातील आहे.

३. स्क्रीन लिमिट टाइम-लहान मुलांना व्हिडिओ कसा ऑपरेट करायचा हे कळत नसते म्हणून पालकच त्या व्हिडिओचा स्क्रीन लिमिट टाइम ठरवू शकतात. यामुळे मुलगा नुसता मोबाईल पाहत राहिला तरी काही सेट केलेल्या टाइमपर्यंतच तो व्हिडिओ पाहू शकतो.

हे सुद्धा वाचा- हि लक्षणे असतील तर सावधान ! तुमचं मानसिक संतुलन बिघडत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here