छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक | Chhatrapati Sambhaji Rajyabhishek |

छ्त्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji Maharaj) हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य आहेत. त्यांच्या निमित्ताने स्वराज्य निर्मिती झाली, पण तिचा कार्यभार जबाबदारीने सांभाळणे आणि मराठा साम्राज्य वाढवण्याचे खरे काम स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapti SambhajI Maharaj) यांनी केले. त्यांना छत्रपती म्हणून मिळालेली पदवी त्यांचे माहात्म्य सिद्ध करते. या लेखात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक (Chhatrapati Sambhaji Rajyabhishek) कसा झाला याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक पूर्वकाळ | श्रीशंभुराज्याभिषेक|Chhatrapti Sambhaji Maharaj Rajyabhishek |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचानक झालेल्या निधनानंतर रयत पुन्हा एकदा बिथरली जाऊ शकत होती. स्वराज्याचे धाकले मालक संभाजी महाराज हे राज्यकारभार पाहतच होते परंतु आता राज्याला छत्रपतींची गरज होती. त्या गरजेला ओळखून शंभूराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन घेतला. स्वराज्य व्यवस्थित आणि नेटाने चालवण्याचे आव्हान त्यांनी या दिवसानंतर पेलले.

राज्याभिषेक सहज व्हावा आणि तो सर्वमान्य असावा अशी परिस्थिती असताना देखील जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या गेल्या. छ्त्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा त्यांच्या राज्याभिषेकावेळी शंभू महाराज युवराज होते तेव्हाच स्पष्ट झाले होते की संभाजी महाराजच भावी छत्रपती असतील.

राजा शंभू हे शिवाजी महाराजांबरोबर लहानपणापासून दौडत होते. त्यांच्या सोबत राहिले होते. सर्व युद्धकला, शास्त्र, आणि राजकारण यामध्ये तरबेज झाले. त्यामुळेच शिवछत्रपतींचाच्या आदेशावरून पन्हाळा गडावरून त्यांनी स्वतःची
कारकीर्ददेखील सुरू केली. तेथील परिसराचा राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.

छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यानंतर आणि शंभूराजांच्या गैरहजेरीत वयाने खूपच लहान असलेले राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला पण शंभूराजांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली. गादीसाठी फुटीर राजकारण स्वराज्यात होऊ शकते याचे भान राखून शंभूराजांनी राज्याभिषेक करवून घेण्याचा निर्णय घेतला.

शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच २० जुलै १६८० रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि स्वतः स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाल्याचे घोषित केले.

(तारखे संदर्भात विविध मतभेद आढळतात याची नोंद घ्यावी)

श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा | chhatrapati sambhaji maharaj Rajyabhishek |

बिकट काळात आणि वातावरणात मंचकरोहणात राज्याभिषेक झाला होता पण शास्त्रार्थ दृष्टीने त्यामध्ये दोष असल्याचे सर्वांना आढळले. विधियुक्त राज्याभिषेक झाला पाहिजे असे शंभूराजांना पण वाटू लागले त्यानुसार मग रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२ म्हणजेच १४, १५ व १६ जानेवारी १६८१ यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.

राज्याभिषेकावेळी पूर्व कैद्यांना मुक्त करणे अशी परंपरा असल्याने शंभू राजांनी त्यांना मुक्त केले. राज्याभिषेक प्रसंगी छत्रपती संभाजी राजांनी स्वतःच्या नावे नवीन नाणी (चलन) बनवून घेतली. पुढील बाजूस “श्री राजा शंभूछत्रपती” अशी अक्षरे कोरली तर मागील बाजूस “छत्रपती” हे अक्षर कोरले.

छत्रपती संभाजीराजे यांचे प्रधान मंडळ | Chhatrapati Sambhaji Maharaj Pradhan Mandal |

संभाजी राजे छत्रपती झाल्यानंतर लगेच त्यांनी प्रधान मंडळाची स्थापना केली. ते प्रधान मंडळ पुढीलप्रमाणे –

छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.

श्री सखी राज्ञी जयति (राजाच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी) – येसुबाई संभाजीराजे भोसले.

सरसेनापती – हंबीरराव मोहिते.

कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश.

पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे.

मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी.

चिटणीस – बाळाजी आवजी.

दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव.

सुरनीस – आबाजी सोनदेव.

मुजुमदार – अण्णाजी दत्तो.

डबीर – जनार्दनपंत.

वाकेनवीस – दत्ताजीपंत.

तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक (Chhatrapati Sambhaji Rajyabhishek) हा लेख कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा…धन्यवाद!

वाचकांसाठी आवाहन –

ऐतिहासिक घटना या काळाप्रमाणे वाढवून आणि बदलून सांगितल्या जातात. त्यामध्ये अधिक रस येण्यासाठी कधीकधी अतिशयोक्ती देखील केलेली असते. आत्ताच्या पिढीत झालेले लिखाण हे मागील पिढीतील केलेल्या लिखाणावर आधारित असते म्हणून खरा इतिहास आपल्याला कळण्याचे मार्ग तसे खूप कमी आहेत. अशा संदर्भाने आम्ही प्रसिद्ध केलेले लेख हे एक प्रकारे माहितीचा आधार घेऊन केलेले ऐतिहासिक वर्णन आहे. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही. माहिती चुकीची आढळल्यास त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.

Leave a Comment