व्यसन – मराठी कविता | Marathi Kavita – Vyasan

प्रस्तुत कवितेत व्यसनाविषयी मत मांडण्यात आलेले आहे. व्यसनाची सुरुवात आणि शेवट कसा होतो याची जाण असणे आणि त्यातून मुक्ती प्राप्त करणे अशा काही बाबींचे काव्यात्मक वर्णन या कवितेत करण्यात आलेले आहे.

व्यसन…

गेली सवय कुठेतरी हरवून
ती मैदानी खेळ खेळण्याची
मला आता मज्जा फक्त व्यसनाची…

सहजच वयाची पाने पालटली की
तारुण्याने घातला घेरा
व्यसन आलेच पाठून मलाही मोठा तोरा…

कालचं टेन्शन, आजचं काम अन् उद्याची काळजी
अशी तर फक्त कारणे होती
व्यसनाची सवय तर मला लावायचीच होती…

इतरही व्यसने जडता जडता थोडी झाली
राहावे कसे काय आता निरोगी
सवयच ती लागलेली, राहून राहून मी भोगी…

कित्येक दिवसांचा प्रयत्न व्यसन सोडण्याचा
पण हळूहळू त्यामध्येही अडथळा माझ्याच कर्मांचा…

जीवन असेच व्यसनी म्हणून नको संपावे
माझेही जीवन उंच आणि उदात्त असावे…
या एका स्वप्नावर जागी झाली आशा
व्यसन तर सुटलेच पण कर्मही लागले दिशेला…

तुम्हाला व्यसन ही मराठी कविता (Vyasan Marathi Kavita) असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment