काजू – संपूर्ण माहिती | Cashew Information in Marathi

“काजू – बदाम खा.. काहीतरी अक्कल येईल!” असे वाक्य आपण सतत ऐकत आलेलो आहोत. त्यामधील काजू बी हा अत्यंत पौष्टिक असा सुका मेवा आहे. प्रस्तुत लेखात काजू झाड आणि काजू फळाविषयी संपूर्ण माहिती (Cashew Information in Marathi) देण्यात आलेली आहे.

काजू फळ – मराठी माहिती | Kaju Marathi Mahiti |

काजूच्या फळाचा उपयोग सर्व प्रचलित आहे. काजूचे फळ (बोंडू किंवा जांबू) आणि काजू बी अशा दोन प्रकारे आपण काजू ग्रहण करू शकतो. काजू हे एक फळझाड आहे. काजू फळाला “विलायती मॅंगो” असे देखील संबोधले जाते.

महाराष्ट्रात कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. काजू हे निर्याती फळ आहे. काजूला भारतात आणि परदेशात खूप मागणी आहे.

संपूर्ण जगभरात भारत जवळजवळ ६० टक्के काजू निर्यात करतो. काजूचे उपयोग आणि महत्त्व ओळखता भविष्यात काजूची निर्यात वाढणार आहे.

काजू फळाला हिंदीमध्ये “हिज्जली बदाम”, कन्नडमध्ये “गेरू”, मल्याळममध्ये “कचुमाक” आणि तेलुगूमध्ये “जीडिमा मिडि” असे संबोधले जाते.

काजूच्या फळापासून विविध प्रकारचे मद्य आणि रस तयार करता येतात. ज्यामध्ये गोव्यातील “काजू फेणी” अत्यंत प्रसिद्ध आहे. गोवा देखील काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

काजूगरांना उष्णता दिल्याने कवच वेगळे होते आणि आपल्याला काजू बी मिळते. काजूचे बी भाजून साल वेगळी केल्यास आपल्याला खाण्यायोग्य काजू मिळतो.

काजूचे अन्य उपयोग – Other Uses Of Cashew Nuts

काजूपासून काजू-तेल सुद्धा मिळते. सौंदर्यप्रसाधनांत हे तेल उपयुक्त आहे. काजूतेल देखील भारतातून निर्यात केले जाते.

काजू हा सुका मेवा म्हणून ग्रहण करत असल्याने त्याचा लाडू, शिरा, पुलाव इत्यादी पाककृतींमध्ये समावेश असतो तसेच “काजूकरी” ही हॉटेल अथवा धाबा यामध्ये एक उत्तम डिश आहे.

सर्व मिठाई प्रकारांत आपण काजूचा वापर करू शकतो. विशेषकरून काजूचे काजूबर्फी आणि काजूकतली हे अन्य मिठाई प्रकार आहेत तसेच खारे काजू देखील अत्यंत आवडीने खाल्ले जातात.

काजू खाण्याचे फायदे – Benefits of Cashew In Marathi |

• कॅल्शिअम, स्निग्ध पदार्थ, खनिजे, फॉस्फरस, कर्बोदके आणि प्रोटीन्सचा उत्तम स्रोत म्हणून काजुला ओळखले जाते.

• बोंडूमध्ये (काजु फळ) फायबर विपुल प्रमाणात असते. बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

• काजू हृदयरोग आणि मधुमेह टाळण्यासाठी सहाय्यक आहे.

• काजू नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

• काजू हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

• काजूच्या प्रति १०० ग्रॅमला ५९० कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते.

काजू झाड माहिती | Cashew Tree Information In Marathi |

काजू हे आम्र कुलातील झाड असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे.

काजूचे झाड मूलतः अमेरिकेतील आहे, अशी मान्यता आहे. पोर्तुगिज लोकांनी ते भारतात आणले. तसेच काजू हा शब्द देखील पोर्तुगिज आहे आणि सध्या तेच नाव मराठीत सुद्धा आरूढ झाल्याचे पाहायला मिळते.

काजूचे झाड आखूड आणि जाड असते. या झाडाचा विस्तार जास्त असतो. पाने मोठी आणि अंडाकृती असतात.

काजूच्या फळाचे बोंडू आणि काजूगर असे दोन भाग असतात. बोंडू हे पिवळ्या रंगाचे फुगीर आणि रसाळ फळ असते.

काजू फळाबद्दल संपूर्ण माहिती (Cashew Information in Marathi) वाचल्यानंतर नक्कीच तुमची काजूविषयी आणखी जिज्ञासा वाढली असेल. तर नक्कीच काजू विकत घ्या, सुके आहेत तसे खा किंवा त्याच्या विविध रेसिपीज बनवा… धन्यवाद!

Leave a Comment