ट्रेडिंगचे प्रकार – मराठी माहिती | Types of Trading in Marathi |

व्यापार करणे म्हणजे नुसती खरेदी – विक्री करणे नसते तर मुबलक फायदा आणि कमीत कमी जोखीम उचलून स्वतःचा फायदा करवून घेणे असते. त्यासाठी व्यापारविषयक सर्व माहिती असणे गरजेचे आहे. प्रस्तुत लेखात ट्रेडिंगचे प्रकार (Types of Trading in Marathi) सांगण्यात आलेले आहे, ज्याद्वारे तुम्हाला ट्रेडिंगविषयी सखोल माहिती मिळेल.

ट्रेडिंगचे प्रकार – मराठी माहिती | Types of Trading Information in Marathi |

• स्कॅल्पिंग ट्रेडिंग (Scalping Trading) –

ट्रेडिंगच्या या प्रकाराला मायक्रो-ट्रेडिंग असेही म्हणतात. स्कॅल्पिंगमध्ये वारंवार नफा कमावणे समाविष्ट असते. हा व्यापार काही सेकंद ते काही मिनिटे देखील असतो.

ज्या गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये त्यांच्या गुंतवणुकीबाबत आत्मविश्वास आहे आणि ज्यांना पुरेसा अनुभव आहे त्यांना ही रणनीती अंमलात आणता येते, कारण त्यासाठी अनुभव आणि कौशल्य आवश्यक आहे.

या पद्धतीचा वापर करून, गुंतवणूकदार एकाच दिवसात अनेक व्यवहार करतात. ते स्टॉक किंमतीबद्दल अत्यंत दक्ष राहतात आणि अत्यंत कमी वेळात नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात.

• इंट्राडे ट्रेडिंग / डे ट्रेडिंग (Intraday Trading) –

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवशी स्टॉक खरेदी करणे आणि बाजार बंद होण्यापूर्वी तो विकणे. गुंतवणूकदार काही मिनिटांपासून काही तास स्टॉकची पोझिशन ठेवू शकतात. बाजार सकाळी 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत खुला असतो.

या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदाराला अत्यंत सतर्क राहावे लागते. स्टॉक खरेदी किंवा विक्री करताना त्याची किंमत पोझिशननुसार फायदेशीर ठरेल का, हे पाहावे लागते. गुंतवणुकीचा धोका जास्त असल्याने होणारा नफा देखील जास्तच असतो.

• मोमेंटम ट्रेडिंग (Momentum Trading) –

हा एक “ब्रेकआउट” स्टॉक आहे. स्टॉकची किंमत जी निर्धारित पातळीच्या सतत बाहेर जात आहे, म्हणजेच त्या स्टॉकची स्थिती सतत बदलत असते.

जेव्हा एखादा गुंतवणूकदार असा स्टॉक ओळखतो, तेव्हा तो स्टॉक किती वेगाने बदलत आहे त्यानुसार गुंतवणूकदार कित्येक तासांपासून ते कित्येक दिवसांपर्यंत त्यांची पोझिशन राखून ठेवतात आणि चांगला नफा कमावतात.

• स्विंग ट्रेडिंग (Swing Trading) –

स्विंग ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार एक ते सात दिवसासाठी गुंतवणूक करू शकतात. यामध्ये स्टॉकची मागील कालावधीतील स्थिती पाहणे आवश्यक ठरते. या प्रकारात एक ते सात दिवसात स्टॉकमधील प्रगती पकडण्याचे उद्दीष्ट असते.

गुंतवणूकदारांना स्टॉकची मूलभूत तत्त्वे आणि त्यातील मूळ मूल्यांमध्ये रस नसतो परंतु त्यातील किंमतींच्या नमुन्यांमध्ये आणि ट्रेंडमध्ये त्यांना विशेष रस ठेवावा लागतो. स्टॉकच्या हालचालीनुसार गुंतवणूकदार तीन ते सात दिवसांत त्यांची पोझिशन ठरवत असतात.

• पोझिशन ट्रेडिंग (Position Trading) –

गुंतवणूकदार स्टॉकच्या हालचालीबद्दल जागरूक असतील तर काही स्टॉक्स त्यांना दीर्घ काळात बदलताना दिसतात. त्यावेळी त्यांना त्यांची पोझिशन होल्ड करून ठेवावी लागते. अशा विशिष्ट प्रकारच्या ट्रेडिंगला पोझिशन ट्रेडिंग असे म्हणतात.

एखाद्या विशिष्ट स्टॉककडे दीर्घ मुदतीचा दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. म्हणूनच, जे या गुंतवणूकीची निवड करतात त्यांना अपेक्षा असते की सध्याचा ट्रेंड मोमेंटम किंवा स्विंग ट्रेडिंगपेक्षा बराच काळ टिकणारा असावा.

दीर्घ-मुदतीच्या स्थितीमुळे, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात नफा कमावतात. शिवाय, त्यांना अल्प-मुदतीच्या चढ-उतारांबद्दल भीती वाटत नाही.

तुम्हाला ट्रेडिंगचे प्रकार – मराठी माहिती (Types of Trading in Marathi) हा लेख आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment