Chicken 65 recipe in Marathi । घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवा चिकन ६५!

chicken 65 पदार्थ आज भारतात आणि महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध होत आहेत. चिकन ६५ हा देखील त्यातलाच एक चिकनचा पदार्थ. बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर खूप करावा लागणारा खर्च आणि वेळेअभावी तुम्ही chicken 65 recipe घरीदेखील बनवू शकता.

Chicken 65 ingredients
साहित्य –

१. फ्रेश चिकन – ५०० ग्रॅम

२. टोमॅटो – २

३. हिरव्या मिरच्या – ३

४. हळद – १ चमचा.

५. लिंबू – १

६. लाल तिखट – ३ चमचे.

७. दही – ३ चमचे

८. कढीपत्ता – १०-१२ पाने

९. गरम मसाला – अर्धा चमचा.

१०. मीठ स्वादानुसार

११. लोणी – ३ चमचे.

How to make Chicken 65 Recipe.
कृती –

चिकनचे रवे –
१. टोमॅटो रस्सा बनवण्याअगोदर १ तास चिकनला लाल तिखट, हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावून बाजूला ठेवून द्या.

२. तळण्यासाठी कढईत तेल घ्या. चांगले खरपूस चिकनला तळून घ्या.

टोमॅटो रस्सा –
१. टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. टोमॅटो मध्ये दही मिसळा. आता हे मिश्रण बाजूला ठेवा.

२. कढईत लोणी टाका. लोण्यात कढीपत्ता, मिरच्या परतून घ्या. आता टोमॅटो रस्सा टाका. २-३ मिनिटे शिजू द्या.

३. तळलेले चिकनचे तुकडे टाका. झाकण लावून मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजू द्या.

४. आता गरम मसाला आणि मीठ टाका. झाकण ठेवा आणि ५ मिनिटे शिजू द्या.

५. तुम्हाला रस्सा जास्त पातळ हवा असल्यास थोडे पाणी टाका. नाहीतर आहे तशी रेसिपी सर्व्ह करा.

टीप –
१. रेसिपी बनवताना गरम मसाला आणि मीठ योग्य प्रमाणात वापरा.
२. तिखट, मीठ, हळद, लिंबाचा रस लावलेले चिकनचे तुकडे पातळ बेसन मध्ये बुडवून तळू शकता.

Leave a Comment