माझा आवडता खेळ – बॅडमिंटन निबंध | Badminton Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा माझा आवडता खेळ – बॅडमिंटन (Badminton Marathi Nibandh) या विषयावर मराठी निबंध आहे. या निबंधात बॅडमिंटन खेळाविषयी सर्व प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. हा खेळ कसा खेळला जातो, याचे नियम व अटी, हा खेळ का आवडतो अशा बाबींची चर्चा या निबंधात केलेली आहे.

माझा आवडता खेळ – बॅडमिंटन निबंध | My Favourite Game – Badminton Essay In Marathi |

प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी बॅडमिंटन खेळलेला असतोच. शारिरीक जखम होण्याचा जास्त धोका नसल्याने महिला आणि पुरुष असे दोघेही हा खेळ आवडीने खेळू शकतात. सर्व वयोगटातील व्यक्ती हा खेळ खेळणे पसंद करतात. बॅडमिंटन खेळात शारिरीक चपळता, एकाग्रता आणि निर्णय क्षमता यांचा कस लागत असतो.

बॅडमिंटन हा खेळ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे. जागतिक बॅडमिंटन संघटनेतर्फे विविध प्रकारच्या बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये अनेक देशांमधील कुशल खेळाडू सहभागी होत असतात. ऑलिम्पिक स्पर्धेत देखील या खेळाचा समावेश असतो.

“बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन” ही आंतरराष्ट्रीय संस्था बॅडमिंटन खेळाचे नियंत्रण करत असते. बॅडमिंटन खेळाच्या मैदानाला बॅडमिंटन कोर्ट असे म्हणतात. बॅडमिंटन खेळात सिंगल्स (2 स्पर्धक), डबल्स (4 स्पर्धक) आणि मिक्स (पुरुष – महिला मिळून 4 स्पर्धक) अशा पद्धतीत सामने खेळले जातात.

बॅडमिंटन मैदानाची लांबी 44 फूट असते. यामध्ये एकेरी सामन्यासाठी रुंदी 17 फूट असते तर दुहेरी सामन्यासाठी रुंदी 20 फूट असते. मैदानाच्या बरोबर मध्यभागी नेट बांधली जाते. बॅडमिंटनसाठी जे अंडाकृती आकाराचे रॅकेट वापरले जाते त्याने शटलकॉक हे नेटच्या वरून मारायचे असते.

बॅडमिंटन हा खेळ एकूण 21 गुणांचा असतो. 21 गुण झाले की त्याला सेट असे संबोधले जाते. असे एकूण तीन सेट एका सामन्यामध्ये खेळले जातात. आपण मारलेले शटलकॉक जर प्रतिस्पर्धी खेळाडू परत आपल्याकडे मारू शकला नाही तर आपल्याला १ गुण मिळतो. गुण परीक्षण करण्यासाठी पंच असतात.

लहानपणापासून मला बॅडमिंटन या खेळाचे खूपच आकर्षण वाटते. भारतातील प्रसिध्द खेळाडू साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, पी. कश्यप यांचे सामने मी टीव्हीवर पाहत आलेलो आहे. पी. व्ही. सिंधू ही माझी आवडती खेळाडू आहे.

आमच्या शाळेतर्फे एकदा तालुका स्तरावर बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी मला उपविजेतेपद मिळाले होते. आमच्या घरी बॅडमिंटन खेळाचे सर्व साहित्य आहे तसेच घराशेजारी बाबांनी खेळासाठी मैदान देखील तयार केले आहे. तेथे आम्ही नेट बांधून बॅडमिंटनचा सराव करतो.

बॅडमिंटन खेळात सरावाची खूप गरज भासते. तसेच शरीर लवचिक बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा व्यायाम करावा लागतो. या खेळात गती आणि निर्णयक्षमता आवश्यक असल्याने मला सराव करताना तशा प्रकारची आव्हाने सरावात सामील करून घ्यावी लागतात.

बॅडमिंटन खेळ खेळताना शरीर, मन आणि बुद्धी अशा सर्व स्तरावर एका खेळाडूचा कस लागत असतो. त्यामुळे व्यक्तिमत्त्वात एक संतुलन निर्माण होत असते. या खेळात शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढत असल्याने खेळताना खूप आनंद मिळतो. त्यामुळेच बॅडमिंटन हा माझा आवडता खेळ आहे.

तुम्हाला माझा आवडता खेळ बॅडमिंटन (My Favourite Game – Badminton Essay In Marathi) हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

1 thought on “माझा आवडता खेळ – बॅडमिंटन निबंध | Badminton Marathi Nibandh |”

Leave a Comment