हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक –

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. तर २६ नोव्हेंबर रोजी आयपीएल लिलावापूर्वी सर्व १० संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने मोठा सट्टा खेळला असून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

आता IPL २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ आणखी मजबूत दिसत आहे. मुंबईला मागच्या दोन वर्षांत एका भारतीय फास्टर ऑल राऊंडरची कमतरता जाणवत होती पण आता त्यांनी ती कमतरता भरून काढलेली आहे.

बुम्राह आणि हार्दिक पांड्या दाखवतील का यशाची वाट?

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आयपीएल २०१५ मध्ये पदार्पण केले. हार्दिक पांड्या २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. मात्र यानंतर हार्दिक पांड्याला मुंबईने सोडले. त्यानंतर गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पांड्याला आपल्या संघात समाविष्ट केले. पण आता हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ आणखी मजबूत दिसत आहे.

यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघात खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२३ मध्ये जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर होता. मात्र जसप्रीत बुमराह या आयपीएलच्या पुढील सत्रात खेळताना दिसणार आहे. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी आणखी मजबूत होईल.

मुंबई इंडियन्स संघ २०२० मध्ये शेवटच्या वेळी चॅम्पियन बनला होता. मात्र मुंबई संघाची कामगिरी गेल्या ३ वर्षात काही विशेष झाली नाही. पण आता हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनानंतर मुंबई इंडियन्स संघातील प्लेइंग ११ खूप मजबूत दिसत आहे. त्याचा फायदा यावर्षी होतोय का ते पाहावे लागेल.

चेन्नई, आरसीबी, राजस्थान, गुजरात अशा मातब्बर संघांना मात देण्यात मुंबई यावर्षी यशस्वी ठरते का ते देखील पाहावे लागेल…

Leave a Comment