आज सकाळी संसदेच्या कार्यवाही सुरू झाल्यानंतर विधेयक चर्चेसाठी ठेवण्यात आला व चर्चा होत असताना सरकार व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली पण चर्चे दरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकारने उत्कृष्टरित्या दिले.
काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी काश्मीर हा भारताचा आंतर्गत मुद्दा नसून तो एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे व सन १९४८ पासून संयुक्त राष्ट्र यावर लक्ष ठेवून आहे असा आपत्तिजनक वक्तव्य केले यानंतर भाजपाच्या सदस्यांनी याला तीव्र असा विरोध करून काँग्रेसविरोधात घोषणाबाजी सुरू केली.
या सगळ्या नंतर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस वर टीका करताना काँग्रेस ला काश्मीर वर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले एवढेच नाहीतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला व काश्मीर साठी आपण जीव ही देऊ शकतो असे सांगितले. गृहमंत्री अमित शाह यांचा हा रुद्रावतार बघून सर्व संसद सदस्य अचंबित झाले. तसेच यानंतर सुध्दा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्री अमित शाह म्हणाले की “काश्मीर प्रश्नावर ७० वर्षे झाली फक्त चर्चा सुरू आहे.
तीन पिढ्या होऊन गेल्या तरी यावर अजून मार्ग निघाला नाही. तसेच जे लोक पाकिस्तान कडून प्रेरणा घेतात त्यांच्याशी चर्चा करायची का? असा प्रतिप्रश्न सुध्दा उपस्थित केला. यापुढे हुर्रियत नेत्यांशी आम्ही चर्चा करणार नाही हे सुध्दा सभागृहाला ठणकावून सांगितले. आम्हाला चर्चा करायची असेल तर आम्ही काश्मीर खोऱ्यातील जनतेशी संवाद साधू व आम्हाला काश्मीर चा विकास करायचा असून काश्मीर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी विशेष असे प्रयत्न करू असेही त्यांना सांगितले.
its really nice article. best news site. appriciated ur business standard.
also im writing inepaper hindustan times