ajit dobhal biography

मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर मधून कलम ३७० व कलम ३५(अ) काढल्यानंतर चर्चेत आलेलं नाव म्हणजे ५ वे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल. जम्मू आणि काश्मीर मधून कलम ३७० रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते रद्द झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर मध्ये शांतता राखण्याची मोठी जबाबदारी अजित डोभाल यांच्या वर होती.

ही जबाबदारी अजित डोभाल यांनी यशस्वीरित्या पार पाडली व काश्मीर मधल्या लोकांमध्ये जाऊन त्यांनी या निर्णयाचे महत्व समजुन सांगितले. तसेच काश्मीर मधल्या लोकांबरोबर जेवण सुध्दा केले या सर्व काळात बऱ्याच लोकांना अजित डोभाल यांच्या बद्दल माहिती नसते तीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार होणार आहोत.

१) अजित डोभाल यांचा जन्म सन १९४५ रोजी उत्तराखंड राज्यामध्ये झाला व त्यांचे वडील मेजर जी एन डोभाल हे सुध्दा भारतीय सैन्यात अधिकारी होते.

२) अजित डोभाल हे १९६८ केरळ क्याडर मध्ये IPS ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली व त्यांनी त्यानंतर मिझोराम व पंजाब मध्ये स्तिथी सुधारण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. त्यांचे हे कार्य कौतुकस्पद आहे.

3) सिक्कीम राज्याचे भारतात विलीनीकरण करण्यामध्ये सुध्दा त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली व चींन मध्ये त्यांनी बराच काळ घालवला. तसेच १९८८ चे ऑपरेशन ब्लॅक थंडर होण्याआधी त्यांनी गोल्डन टेम्पल मध्ये माहिती गोळा करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं.

४) भारताला गुप्त माहिती पुरवण्यासाठी त्यांनी पाकिस्तान मध्ये गुप्तहेर म्हणून ७ वर्ष काम केले तसेच आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी काही काळ पाकिस्तान सैन्यामध्ये सुध्दा काम केले. त्यांच्या या शौर्याला आमचा सलाम.

५) सन १९९९ मध्ये जेव्हा कंधार विमान हायजॅक प्रकरण समोर आले तेव्हा आतंकवाद्याशी बोलणी करण्यासाठी जी तीन लोक भारत सरकारने पाठवली त्यामध्ये अजित डोभाल यांचे नाव सुध्दा होते. त्यामध्ये त्यांनीं आपले काम योग्यरित्या पार पाडले.

६) सन २००५ मध्ये अजित डोभाल हे डायरेक्टर म्हणून इंटेलिजन्स ब्युरो मधून निवृत्त झाले. तिथून त्यांनी वेगवेगळया वृत्तपत्रांत आपल्या लेखांनी लोकांची मन जिंकली तसेच यातून त्यांचा असणारा भारताच्या सुरेक्षेसंबंधीचा अभ्यास हा संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला.

७) सन २०१४ मध्ये त्यांची नियुक्ती ५ वें राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून झाली आणि आगमनातच त्यांनी आपली कर्तव्यदक्ष भूमिका दाखवत इराक मध्ये आतंकवाद्यांनी बंदी बनवलेल्या ४६ नर्स ना सोडवण्यासाठी गुप्त योजना आखून त्यांना जिकिरीने सोडवले व विशेष विमानाने कोचीन येते आणले.

८) पुलवामा हल्ल्यानंतर त्यांच्या बालाकोट एअर स्ट्राईक मध्ये सुध्दा त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली व विंग कमांडर अभिनंदन ला सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले.

९) जून २०१९ त्यांची पुन्हा एकदा ५ वर्षासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली व त्यांना
कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

नक्की आहे तरी काय, हे कलम ३७0 व ३५ (अ)…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here