आरक्षण मराठी निबंध | Arakshan Marathi Nibandh |

आरक्षण हा सतत चर्चिला जाणारा मुद्दा आहे. आरक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी आरक्षण हा मराठी निबंध (Arakshan Marathi Nibandh) लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!

आरक्षण मराठी निबंध | Reservation Essay In Marathi |

आरक्षण हा शब्द आपण सतत ऐकत आलेलो आहोत. आरक्षणाचा मूळ मुद्दा सतत बाजूला ठेवला जातो आणि राजकारणच समोर येत असते. राजकीय पक्ष आपापल्या फायद्याप्रमाणे आरक्षणाचा मुद्दा हाताळत असतात.

समाजाचा, राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला आरक्षण काय आहे हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. भारत हा एकसंध देश असला तरी विविध धर्म आणि जाती यांचे वास्तव्य येथे आहे. प्रत्येक राज्यात आपल्याला जाती – पोटजाती दिसून येतील.

राज्यातील सरकारला जर विशिष्ट जातीसाठी आरक्षण हवे असेल तर तशी मागणी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे करायची असते. राज्यघटनेच्या कलम 15(4) मध्ये असं म्हटलं आहे की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी विशेष तरतूद सरकार करू शकते.

राज्यात एखादा समाज बहुसंख्य असेल तर तो नक्कीच मागासलेला नसणार आणि शिक्षण आणि इतर क्षेत्रात त्याच्या उपजीविकेच्या सर्व संधी उपलब्ध असणार. आता आरक्षण नसेल तर मात्र समाजातील सर्व जाती जमातींच्या लोकांना सरकारच्या सुविधा आणि योजनांचा लाभ होणार नाही.

जातीनिहाय आरक्षण दिले जाण्याचे कारण म्हणजे सर्व जातीतील लोक एका समान जीवन जगण्याच्या स्तरावर आले पाहिजेत. एकदा का बहुतांश लोकसंख्या बऱ्यापैकी उपजीविका करू लागली तर मग आरक्षण हटवले जाऊ शकते.

अनुसूचित जातीजमातींना जगण्याचे सर्व हक्क मिळाले पाहिजेत आणि त्यांनाही न्यायाने वागवता आले पाहिजे असा आरक्षण देण्यामागचा हेतू आहे. पूर्वी लोकांच्या कामावरून जात ठरवली जात असे परंतु आता विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले असताना नोकरीच्या आणि कामाच्या असंख्य संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

ते काम करण्यासाठी समाजातील कोणीही उत्सुक असेल तर त्याला ती संधी निर्माण झालीच पाहिजे. जर विशिष्ट जातीतील लोकांना आरक्षण असेल तर त्या जातीतील तरुण नक्कीच शिक्षणाचा विचार करतील. न्याय आणि हक्कांच्या स्पर्धेत नक्कीच ते तुलनात्मक विकास साधू शकतील.

आरक्षण सध्या महत्त्वाचे आहे परंतु काही वर्षानंतर त्याची गरज भासणार नाही. आत्ता समाजात जी स्थिती आहे तेथे सर्वजण बऱ्यापैकी आर्थिक संपन्न होऊ लागले आहेत. कोणीही निराधार किंवा मागासलेले राहिलेले नाही त्यामुळे एकदा का सर्व जाती निहाय समानता जाणवली की आरक्षणाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो.

सर्वच जातींना आरक्षण देणे आणि समसमान संधी उपलब्ध करून देणे किंवा सर्व आरक्षण हटवणे अशा पर्यायांपैकी एखादा पर्याय निवडावा लागेल. त्याची शक्यता भविष्यात जाणवते जेथे आर्थिक, सामाजिक, आणि शैक्षणिक मागासलेपण दूर झालेले असेल.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला आरक्षण हा मराठी निबंध (Arakshan Marathi Nibandh) आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment