Amazon-rainforest-fire

जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून चर्चिले जाणारे ॲमेझॉन जंगल हे काही दिवस झाले वणव्याच्या कचाट्यात सापडले आहे. जिकडे बघावे तिकडे फक्त आग आणि धूर. जगातील सर्वात जास्त निसर्गसंपत्ती जर कुठे एकवटलेली असेल तर ती ॲमेझॉन जंगलामध्ये पण ॲमेझॉन जंगल हे आगीने जळत आहे.

जगातील एकूण ऑक्सीजन पैकी 20% अक्सिजन हा फक्त ॲमेझॉन जंगल आपल्याला पुरवत असते पण निसर्गाने ॲमेझॉन च्या जंगलावर कोप केल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. अमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग ही एवढी मोठी आहे की ॲमेझॉन च्या जंगलांना लागून असलेला देश ब्राझील हा धुरात दिसेनासा झाला आहे. दिवसाढवळ्या रात्री सारखे वातावरण झाले आहे सगळीकडे धूरच धूर झाला आहे. या आगीमध्ये अनेक जीवसृष्टीतील घटक जळून खाक होतील व आपल्या जीवसृष्टीचे आतोनात नुकसान होईल अशी भीती जाणकारांना वाटत आहे.

ब्राझील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्च च्या रिपोर्टनुसार ब्राझीलच्या अवतीभोवती असणाऱ्या अमेझॉनच्या जंगलांना या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून सुमारे 74,155 वेळा आग लागली असून याचे ॲमेझॉन च्या जंगलांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच आगी चे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील असे चित्र निर्माण झाले आहे. या आगीबद्दल शास्त्रज्ञांनी व पर्यावरणाचा अभ्यास असणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते ॲमेझॉन च्या जंगलाला लागलेल्या आगीमुळे कार्बन मोनॉक्साईड व कार्बन डाय-ऑक्साइड याचे प्रमाण खूप जास्त वाढेल व त्याचा परिणाम ग्लोबल वार्मिंग वाढण्यासाठी होईल.

या आगीची भीषणता एवढी जास्त आहे की सॅटॅलाइट मधून सुद्धा आगीचे चित्र आपल्याला दिसू शकते. तसेच सॅटॅलाइट मधून ब्राझील हा देश धुरा खाली असल्याचे दिसत आहे. काही जाणकारांच्या मते ऑगस्ट ते ऑक्टोंबर या या महिन्यांमध्ये ॲमेझॉन च्या जंगलांना आग लागणे हि खूप सामान्य बाब आहे पण ह्यावर्षी लागलेल्या आगी खूप धोकादायक पातळीवर आहेत व याचा परिणाम निसर्गाच्या साधनसंपत्तीवर होऊ शकतो अशी भीती जाणकारांना लागली आहे.

ॲमेझॉनच्या जंगलात आग लागण्याचे मुख्य कारण ऑगस्ट ऑक्टोंबर या कालावधीत तिथे असणाऱ्या कोरड्या हवामानामुळे तेथील जंगलांना लगेच आग लागू शकते व वाऱ्याच्या वेगाने पसरू शकते. तसेच काही जाणकारांच्या मते यामधून जंगलाच्या आजूबाजूला असणाऱ्या शहरांमधून जंगलात होणारे अतिक्रमण व होणारी अमाप वृक्षतोड, मानवनिर्मित आग, ही काही मानवनिर्मित कारणे सुद्धा ॲमेझॉन जंगलांना आग लागण्यासाठी कारणीभूत आहेत.

ब्राझील सरकारने यासाठी काही एन.जी.ओ ना कारणीभूत ठरवले असून त्याची चौकशी पण सुरू आहे. यातच सलग तीन आठवडे जंगलात असल्यामुळे ब्राझील हा धुरा खाली गेला असून याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.

पावसाळ्यात उद्भवणारे आजार आणि त्यापासून बचाव.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here