Kodungallur
image credit-maggiewang.com

भारतातील शिक्षित नागरिकांचे राज्य म्हणून ओळखले जाणारे केरळ हे सध्या वेगळ्या चर्चेसाठी प्रकाशझोतात आले आहे. आणि ते सुद्धा एका कौतुकास्पद कारणासाठी. केरळ मधील Kodungallur शहरातील नगरपालिकेने एक पर्यावण पूरक असा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार, Kodungallur शहरात घराच्या आवारात दोन झाडे लावली तरच घराची नोंदणी होणार अन्यथा घर नोंदणी होणार नाही. झाडे लावल्याची अधिकारी सर्वप्रथम पुष्टी करतील आणि मगच घर नोंदणी केली जाईल. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. असा निर्णय घेणारं हे भारतातील पहिलेच शहर आहे.या निर्णयामुळे social media वर येथील अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जातंय तसेच असा निर्णय संपूर्ण भारतात लागू व्हावा असं बोललं जातंय.

Kodungallur नगर पालिकेच्या आवारात जर १५०० स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा आधिक मोठे घर बांधायचे असेल तर तुम्हाला तुमच्या परिसरात किमान दोन झाडे लावणे बांधनकारक असेल. असे न केल्यास तुमच्या घराची नोंदणी केली जाणार नाही. याविषयी अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले कि बिल्डींग्स बांधत असताना झाडे कापली जातात आणि त्यांनतर झाडे लावली जात नाहीत. म्हणजे पर्यावरणाचा नाश करण्याचा हक्क आहे पण त्याचा सांभाळ करण्याचं कर्तव्य आपण बजावत नाही. त्यामुळे असे पर्यावरण पूरक निर्णय घेणे अपरिहार्य आहे.

हि बातमी Social media वर viral होताच लोकांच्या पॉसिटीव्ह कंमेंट्स आल्या. असा उपक्रम हा भारतातील प्रत्येक शहरात राबवला गेला पाहिजे असा सूर उमटला तसेच पर्यावरणाच्या जागृती साठी सर्वानी एकत्र येऊन काम करायला हवं असंही बोललं गेलं.अशा उपक्रमामुळे लोकांत पर्यावरणविषयी जागृती निर्माण होतेय हेच या माध्यमातून पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here