सैनिकाचे मनोगत – मराठी निबंध | Sainikache Manogat Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा सैनिकाचे मनोगत (Sainikache Manogat Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात सैनिकाचे जीवन, त्याची देशाप्रती समर्पित भावना अशा बाबींचे वर्णन केलेले आहे.

सैनिकाचे मनोगत निबंध मराठी | Sainikache Manogat Marathi Essay |

माझे नाव श्रीकांत मनोहर पाटील आहे. मी भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारा एक सैनिक आहे. मी गेली आठ वर्षे सैन्यदलात काम करत आहे. अत्यंत स्वाभिमानी, शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि देशासाठी समर्पित असणाऱ्या अशा सैनिकाच्या जीवनाविषयी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे.

लहानपणी शाळेत असताना वीर पुरुषांच्या आणि सैनिकांच्या कथा ऐकताना मी नेहमीच भारावून जात असे. मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपणही काहीतरी असेच काम करावे असे मला मनोमन वाटत असे. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच मी सैनिक होण्याचे स्वप्न पाहिले होते.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्यावर खूप भर दिला. सलग तीन वर्षे खूप मेहनत घेतली आणि भरतीसाठी तयार झालो. पहिल्यावेळी अयशस्वी ठरल्यानंतर मी दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा जिद्दीने यशस्वी होत भारतीय सैन्यात भरती झालोच. त्यावेळी मी आणि माझ्या घरचे अत्यंत आनंदी झालो होतो.

भरतीची प्रक्रिया झाल्यानंतर माझे प्रशिक्षण सुरू झाले. अत्यंत कठोर अशा प्रशिक्षणानंतर माझे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य खूप सुधारले. शत्रूशी अत्यंत प्रखरपणे लढा देण्यास आणि कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यास मी आता तयार झालो होतो. माझी निवड सुरुवातीला काश्मीरमध्ये सीमेवर झाली.

सुरुवातीचा काळ अत्यंत कठोर होता. सर्वत्र सैनिकी वातावरण आणि घरापासून इतक्या दूर असल्याने मला नेहमीच घरच्या लोकांची आणि गावच्या मित्रांची आठवण येत असे. परंतु देशसेवेचे व्रत आठवले आणि सैन्यातील माझी वर्दी पाहिली की पुन्हा एकदा नव्या जोमाने मी माझ्या कर्तव्याप्रती जागृत होत असे.

मला प्रत्यक्ष युद्धाची संधी मिळाली नाही परंतु दोन वेळा शत्रूंशी चकमक मात्र झाली होती. परकीय शत्रूंनी भारतीय भूभागात घुसण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही चकमकीत आम्ही शत्रू सैन्याला घुसखोरी करण्यापासून रोखले होते. तेव्हा अधिकारी व्यक्तींकडून माझे खूप अभिनंदन करण्यात आले होते.

भारतमातेचे संरक्षण करताना काही भावनात्मक क्षण देखील अनुभवात येत असतात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, भारतीय लष्कर दिन असे दिवस विशेषकरून आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. या दिवशी भारतीय सैन्याची विशेषता आणि तसेच प्रत्यक्ष केल्या गेलेल्या कर्तुत्वाचा प्रभाव सर्वांना जाणवतो.

भारतीय सैन्यात कार्य करणे म्हणजे एक प्रकारे माझ्याकडून देशसेवाच घडत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. करोडो भारतीय लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन ती नेटाने पार पाडणे आणि मातृभूमीसाठी गरज पडल्यास प्राणांची आहुती देणे अशा गोष्टींमुळे एक सैनिक नक्कीच असामान्य ठरत असतो.

तुम्हाला सैनिकाचे मनोगत हा मराठी निबंध (Sainikache Manogat Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

1 thought on “सैनिकाचे मनोगत – मराठी निबंध | Sainikache Manogat Marathi Nibandh |”

  1. हे जे तुम्ही टाकला आहे ते मला अतिशय आवडलेलं आहे आणि ते मला माझा निबंध साठी उपयोगी पडलेल्या आहे आणि हे असेच तुम्ही व्हिडिओ आणि गुगल तू तू तसेच अजून आणखी व्हिडिओ तू मला टाकत राहा धन्यवाद

    Reply

Leave a Comment