जागतिक आरोग्य दिन – मराठी माहिती | Jagatik Arogya Din Mahiti Marathi |

प्रश्न – जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – ७ एप्रिल.

या लेखात जागतिक आरोग्य दिनाबद्दल  माहिती (Jagatik Arogya Din Mahiti Marathi) देण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य दिनाचे महत्त्व आणि आरोग्य दिन कसा साजरा केला जातो याचे वर्णन करण्यात आलेले आहे.

जागतिक आरोग्य दिन माहिती | World Health Day Information In Marathi |

जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व –

• आरोग्याचे महत्त्व सर्वांना कळावे आणि सर्वांनी आरोग्यदायी जीवनासाठी प्रयत्न करावेत यासाठी जागतिक स्तरावर आरोग्यविषयक जनजागृती निर्माण होण्यासाठी जागतिक आरोग्य दिन हा ७ एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो.

• आरोग्य समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी जागतिक आरोग्य संमेलन ७ एप्रिल १९४८ रोजी पार पडले. या संमेलनात आरोग्य समस्यांचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत उपाययोजना केली पाहिजे यावर एकमत झाले.

• मानवी समस्या या सर्वत्र एकसारख्याच असल्याने त्यावर जर मिळून उपाय शोधले तर जलद, प्रभावी आणि स्थिर उपचार उपलब्ध होऊ शकतील, असा उद्देश्य समोर ठेवून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

जागतिक आरोग्य दिन कसा साजरा केला जातो?

जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रत्येक वर्षी एक  थीम लोकांसमोर ठेवली जाते. ही थीम म्हणजे त्यावेळी असलेली समस्या किंवा गरज ओळखून एक उपक्रम तयार केलेला असतो.

सध्या उपलब्ध असलेल्या सर्व सोशल आणि प्रत्यक्ष मार्केटिंग माध्यमांद्वारे आरोग्य दिनाची थीम सर्वत्र पसरवली जाते जेणेकरून लोक त्याबाबत जागृत होऊ शकतील. लोकांना ती समस्या अथवा गरज महत्त्वाची वाटल्यास स्वतःच्या जीवनात आरोग्याच्या दिशेने ते सर्वजण अमुलाग्र बदल करू शकतील.

जागतिक आरोग्य दिन (World Health Day) सर्व जगभरात साजरा होत असल्याने थीमचा प्रभाव हा अत्यंत विधायक जाणवत असतो. इंटरनेटद्वारे सर्व देशातील लोक एकमेकांना जोडले गेले असल्याने जागतिक स्तरावर प्रत्येक वर्षी राबवली जाणारी आरोग्य मोहीम यशस्वी होण्याची शक्यता खूपच वाढते.

जागतिक आरोग्य दिनाची गरज –

आरोग्य समस्या निर्माण झालीच तर त्यावर उपाय शोधणे मानवतेच्या हिताचे असल्याने त्यानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली. संपूर्ण जगभरात सर्वच देश समृद्ध नाहीत. त्या देशांत कोणती आरोग्य समस्या निर्माण झाल्यास त्यांना आरोग्य सेवा आणि उपचार पुरवले जाणे असे महत्त्वपूर्ण कार्य ही संघटना करत असते.

या संस्थेच्या निमित्ताने आरोग्य हा मुद्दा अत्यंत व्यवस्थित आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करून हाताळला जातो. पोलिओ, कोरोना, एच आय वी, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, डेंग्यू, ईबोला अशा अनेक प्रकारच्या आजारांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे महत्त्वपूर्ण कार्य आणि त्याची गरज सर्व देशांना जाणवली.

म्हणजेच मानवी जीवनात आरोग्य हा एवढा महत्त्वपूर्ण मुद्दा असताना त्याचे महत्त्व आणि त्या दिशेने जागरूकतेची गरज लोकांना समजून येण्यासाठी जागतिक आरोग्य दिन अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

निष्कर्ष

तंत्रज्ञानाची आस आणि त्यामुळे निर्माण झालेली मानवाची स्पर्धात्मक वृत्ती तसेच निसर्गापासून हळूहळू दूर होत जाणे हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक सिद्ध ठरलेले आहे. त्याची जाण ठेवून प्रत्येकाने स्वतःच्या गरजा आणि मर्यादा ओळखून एका आरोग्यदायी जीवनाची वाटचाल सुरू ठेवली पाहिजे.

त्यानिमित्ताने आरोग्य म्हणजे काय, सध्याच्या आरोग्य समस्या काय आहेत, भविष्यातील आरोग्य कसे असू शकेल अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला हवीत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त अशा प्रश्नांची उत्तरे सर्वजण मिळून शोधुयात आणि संपूर्ण मानवजातीसाठी एका आरोग्यदायी भविष्याचे स्वप्न पाहुयात.

जागतिक आरोग्य दिन – मराठी माहिती (Jagatik Arogya Din Mahiti Marathi) हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

Leave a Comment