संगणक बोलू लागला तर – मराठी निबंध | Sanganak Bolu Lagla Tar

प्रस्तुत लेख हा संगणक बोलू लागला तर (Sanganak Bolu Lagla Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात असलेला संगणक खरोखर बोलू लागला तर काय होईल या कल्पनेचा विस्तार केलेला आहे.

संगणक बोलू लागला तर… (Sanganak Bolu Lagla Tar…)

जेव्हा संगणक शिक्षणाचा तास असतो तेव्हा मला अत्यंत एकटे – एकटे वाटत असते. स्वतःचेच विचार चालू असतात आणि संगणकाची स्क्रीन समोर असते. अशातच आज आमच्या शाळेतील संगणकाचा तास जास्त वेळ घेतल्याने मी खूप वेळ गप्प बसून होतो तेव्हा माझ्या मनात विचार आला की संगणक बोलू लागला तर…

संगणक खरोखर बोलू लागला तर खूप बरे होईल. सध्या संगणक आणि इतर तांत्रिक उपकरणे वापरणे म्हणजे नित्याचीच बाब आहे. मनुष्य एकटा संगणकावर काम करून उदास होत असतो. त्यामुळे संगणक स्वतःहून बोलायला लागला की कोणताही व्यक्ती कधीच कंटाळा अनुभव करणार नाही.

कोणतेही काम आपण संगणकाला विचारून अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. त्याबाबतीत संगणक स्वतःहून आपल्याला बोलून मदत करेल. त्यामुळे संगणकावर काम करताना काहीच अडचणी येणार नाहीत. संगणकाला असलेल्या स्मृतीचा वापर करून तो स्वतः खूप सारी माहिती आपल्याला सांगू शकेल.

संगणक बोलू लागला की अभ्यास अथवा काम करताना एकटे आणि उदास वाटणार नाही. आपण जसे दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलतो त्याप्रमाणेच संगणक देखील आपल्याला “जेवलात का?”, “बरे आहात का?” असे विचारून आपली ख्याली खुशाली विचारेल. तसेच शुभ सकाळ, शुभ रात्री असे देखील बोलायला सुरुवात करेल.

संगणक स्वतःहून बोलण्याचे खूप सारे फायदे आपल्याला होऊ शकतील. संगणक मानवाप्रमाणे विचार करू शकेल. हळूहळू त्यामध्ये बुद्धी आणि भावना निर्माण होईल. संगणक देखील आपल्याशी कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करू शकेल. आसपासच्या घडामोडी, हवामान, तंत्रज्ञान अशा बाबतींत गप्पागोष्टी करू लागेल.

मानवाला जर कोणी बोलण्यासाठी नसेल तर तो संगणकाशी मैत्री करेल. संगणकावर आपण जी जी कामे करतो त्या कामांत काही चुका असल्यास तो स्वतःहून आपल्याला समजावेल. संगणक बोलू लागला तर सायबर क्राईम व इंटरनेट-सॉफ्टवेअर मधील अडथळे आपल्याला लगेच समजू शकतील.

संगणक बोलू लागल्याने संगणक बिघाडीच्या समस्या दूर होतील. तो आपणहून सांगेल की कधी त्याला बंद करावे आणि किती वेळ चालू ठेवावे. कोणत्या सिस्टीममध्ये बिघाड आहे हे देखील तो सांगेल. याउलट ज्या लोकांना शांत वातावरण पसंद आहे अशा लोकांना संगणक बोलू लागल्यावर आणखी गोंधळ वाढल्याचे जाणवेल.

संगणक ही मानवाच्या उपयोगी वस्तू आहे त्यामुळे तो बोलू लागल्याने एक संघर्ष आणि कलह निर्माण होण्याच्या दाट शक्यता आहेत. संगणक स्वतःहून बोलू लागल्यावर त्याचे एक वेगळे अस्तित्व निर्माण होईल. तो खूप साऱ्या संगणकीय कामात विरोध करू लागेल. त्यानंतर संगणक हा मानवाला हळूहळू स्वतःचा वापर करू देणार नाही.

“संगणक बोलू लागला तर” ही कल्पना अत्यंत छान आहे परंतु वास्तविकपणे ते मानवासाठी अहितकर ठरेल. संगणकाचा शोध व उपयोग हा मानवाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी एकदम योग्य आहे. त्यापलिकडे जाऊन स्वतःहून संगणकाला जर बोलता आले तर परिसरात एक वेगळाच कोलाहल माजेल.

तुम्हाला संगणक बोलू लागला तर हा मराठी निबंध (Sanganak Bolu Lagla Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment