आजचा आयपीएल सामना – LSG Vs CSK | Today’s IPL Match 2022 |

आज चेन्नई विरुद्ध लखनऊ ही रंगतदार लढत होणार आहे. दोन्हीही संघांनी आपला पहिला सामना गमावलेला आहे. त्यामुळे एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी आजची ही लढत प्रेक्षकांसाठी एक चांगलाच अनुभव असेल.

रवींद्र जडेजा विरूध्द के. एल. राहुल

रवींद्र जडेजाने पहिल्या आयपीएल सामन्यात चेन्नईचा नवीन कर्णधार म्हणून नेतृत्वाची कमान सांभाळली होती. महेंद्रसिंह धोनी सध्या कर्णधार नसला तरी त्याची संघातील उपस्थिती चेन्नईला दिलासा देणारी ठरते. पहिल्या सामन्यात धोनीने अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या पडझडीपासून रोखले होते.

लखनऊ संघासाठी के. एल. राहुल हा मोठे आशास्थान आहे. लखनऊ संघ नवीन असल्याने त्यांची संघबांधणी कशी होत आहे हे आजच्या सामन्यातून कळून येईल. युवा क्रिकेटर बदोनी हा गुजरात विरुद्धच्या सामन्यात झळकला होता. त्याच्याकडून याही सामन्यात उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल.

लखनऊ संघातील शिलेदार आणि चेन्नईचे धुरंधर –

संघ जरी नवीन असला तरी लखनऊ संघात एकहाती सामना आपल्या बाजूने झुकवणारे खेळाडू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने के. एल. राहुल, लुईस, डीकॉक, आवेश खान, कृणाल पांड्या यांचा समावेश आहे.

चेन्नईमध्ये यावर्षी हेझलवूड आणि डू प्लेसिस हे खंदे खेळाडू नसले तरी देखील टीम मजबूत वाटते. ऋतुराज, जडेजा, ब्रावो, धोनी, रायुडू हे मॅच विनर खेळाडू संघामध्ये पूर्वीपासूनच सामील आहेत. त्यांची फ्रेंचायजी खूप अनुभवी असल्याने पहिला सामना गमावला असला तरी दुसऱ्या सामन्यात विजयाच्या आशेने पाऊले ठेवली जातील असे दिसते.

Leave a Comment