इच्छा तेथे मार्ग – मराठी निबंध | Ichcha Tethe Marg Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा इच्छा तेथे मार्ग (Ichcha Tethe Marg Marathi Nibandh) हा मराठी निबंध आहे. हा निबंध लिहताना विद्यार्थ्यांनी प्रेरक दृष्टीने विचार करण्याची गरज भासते. इच्छा असेल तर मार्ग मिळतोच अशा आशयाचा हा निबंध आहे.

इच्छा तेथे मार्ग निबंध मराठी | Where There is will, There is a way Essay In Marathi |

कोणतीही कृती पूर्ण करताना आपल्याला मार्ग माहीत असणे गरजेचे आहे. त्या मार्गाचा अवलंब करूनच आपण जगत असतो. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत गरज बघितली जाते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी इच्छेचा वापर केला जातो.

भौतिक विकास हा देखील मानवी इच्छेचाच परिणाम आहे. मानवी ऊर्जेचा आणि क्षमतांचा विकास झाला तर इच्छेचा वापर योग्यरित्या झाला असे म्हणता येईल. म्हणजेच इच्छा तेथे मार्ग या संकल्पनेचे मानवी जीवनात प्रत्यक्ष अवतरण झालेले आपल्याला कळून येते.

वैयक्तिक आणि मर्यादित इच्छा म्हणजे स्वार्थ म्हणता येईल. अशी इच्छा देखील पूर्ण होतेच पण बहुतांश लोकसंख्या स्वार्थ पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असते आणि अशातच मग इच्छा मर्यादित असल्यामुळे पुन्हा जास्त मिळावे अशी वासना निर्माण होते. यातच जीवनाचा संघर्ष उभा राहतो.

प्रथमतः इच्छा म्हणजे काय? हे समजून घेतले तर व्यवस्थित या म्हणीचा अर्थ आपण लावू शकतो. आपण दिवसभर ज्या गोष्टी, जी कामे करत असतो त्या स्वतःच्या आणि सामाजिक इच्छेचा भाग म्हणता येतील. त्यामध्ये इच्छेची गरज आणि त्याच इच्छेचे परिणाम हेदेखील पाहणे आवश्यक ठरते.

सर्वप्रथम, व्यर्थ इच्छा करू नये. त्या इच्छेचा परिणाम सर्व समाजावर, कुटुंबावर, आणि स्वतःवर विधायक पद्धतीने होणार आहे का? असे जर असेल तर मग इच्छा तेथे मार्ग आहेच. यामुळे तुम्ही स्वतः अशी इच्छा कराल ज्यामुळे सर्वांचा विकास आणि कल्याण शक्य आहे.

योग्य इच्छा केल्यावर विचार देखील त्या दिशेने धावू लागतात. त्यानंतर मनात विचार आल्यावर तशी योग्य कृती देखील केली जाते. कला क्रिडा, नोकरी, व्यवसाय, तंत्रज्ञान यांपैकी क्षेत्र कोणतेही असो, त्यामध्ये जर स्वहित आणि मानवी कल्याण लपले असेल तर अशी इच्छा जरूर करावी आणि तिला पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशीलही असावे.

इच्छा करण्याअगोदर जे इच्छेचा परिणाम बघू शकतात त्यांना घवघवीत यश प्राप्त होते. इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अविरत कष्ट उपसण्याची तयारी ठेवून असतात. मोठमोठे शास्त्रज्ञ, संशोधक, खेळाडू, व्यावसायिक असतील त्यांची इच्छा ही कधीच स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी नसते.

आपली इच्छा ही नेहमी परिणाम माहीत नसणारी असते. त्यामुळे आपण यश प्राप्त करतो पण आनंदाची आणि समाधानाची झालर आपल्या जीवनात पसरलेली दिसत नाही. इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे एका चांगल्या भविष्यासाठी उत्तम इच्छेसोबत मार्गक्रमण केल्याने आपल्याला यश मिळेलच.

तुम्हाला इच्छा तेथे मार्ग हा निबंध (Ichcha Tethe Marg Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment