प्रस्तुत लेख हा प्रजासत्ताक दिनाबद्दल १० ओळींचा मराठी निबंध (Republic Day 10 lines Essay) आहे. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि तो कसा साजरा केला जातो याचे मुद्देसूद वर्णन या निबंधात दहा ओळींच्या स्वरूपात केलेले आहे.
प्रजासत्ताक दिन – १० ओळी निबंध मराठी | Prajasattak Din 10 Oli Nibandh Marathi
१. भारतीय प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक वर्षी २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण भारतात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
२. भारताच्या संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाला मान्यता दिली. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले.
३. दरवर्षी २६ जानेवारी दिवशी प्रत्येक शाळा – महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत असतो.
४. शाळा आणि महाविद्यालयांत विविध राष्ट्रभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.
५. २६ जानेवारी या दिवशी शाळेत विद्यार्थी संचलन, देशभक्तीपर समूह गीते, प्रभातफेरी, उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा आदरसत्कार, मान्यवरांची भाषणे असे कार्यक्रमाचे स्वरूप असते.
६. संपूर्ण देशात इतर सरकारी आणि सुरक्षा कार्यालयांत देखील ध्वजारोहण केले जाते.
७. दरवर्षी भारताची राजधानी दिल्लीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला जातो आणि राजपथावर संचलन केले जाते.
८. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत भारतीय सुरक्षा दल संचलन आणि विविध स्वरूपाचे सांस्कृतिक संचलन असा नयनरम्य सोहळा दिल्ली येथे पार पडतो.
९. प्रजासत्ताक दिनी प्रत्येक राज्यात देखील सुरक्षा दलांचे संचलन होत असते, त्याची मानवंदना राज्याचे राज्यपाल स्वीकारतात.
१०. २६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय दिन असल्याने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
तुम्हाला प्रजासत्ताक दिन – १० ओळी मराठी निबंध (Republic Day 10 lines Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…