माझे आवडते फळ – सफरचंद मराठी निबंध |Apple Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा माझे आवडते फळ – सफरचंद (My favourite Fruit – Apple Essay In Marathi) हा मराठी निबंध आहे. या निबंधात सफरचंद फळाचे फायदे आणि महत्त्व सांगण्यात आलेले आहे.

विद्यार्थ्यांना सफरचंद फळाविषयी संपूर्ण माहिती होण्यासाठी सफरचंद या विषयावर निबंध लिहावा लागतो. विद्यार्थ्यांनी या फळाबद्दल अचूक माहिती लिहावी असे अपेक्षित असते.

सफरचंद निबंध मराठी | Safarchand Marathi Nibandh |

सफरचंद हे फळ अत्यंत पौष्टिक असे फळ आहे. सफरचंद खाण्याचे बहुमूल्य असे फायदे असल्याने डॉक्टर सफरचंद खाण्याचा नेहमी सल्ला देत असतात. मानवी शरीरासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारक शक्ती सफरचंदातून मिळत असते.

आशिया आणि युरोप या खंडांमध्ये हे फळ जास्त प्रमाणात आढळते. सफरचंद हे फळ रोझेसी या कुळातील असून फळाचे वैज्ञानिक नाव मेलस डोमेस्टिका (Melus domestica) आहे. सफरचंद फळाला इंग्रजीत ऍपल (apple) असे म्हटले जाते.

सफरचंद फळ हे चवीला गोड – आंबट स्वरूपाचे असते. सफरचंद फळाच्या झाडांसाठी अत्यंत थंड वातावरण आवश्यक असते. सफरचंदाची साल ही लाल तर गाभा पांढऱ्या रंगाचा असतो. सफरचंद फळामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये असतात.

सफरचंद हे फळ लहान मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी गरजेचे आहे. या फळातून त्यांना जास्त प्रमाणात ऊर्जा प्राप्ती होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. सफरचंद हे फळ पचण्यास अत्यंत हलके असल्याने त्याचे सेवन कोणत्याही वयोगटातील लोकांनी केले तरी चालते.

आजारी व्यक्तीला पटकन बरे व्हायचे असल्यास डॉक्टर औषधे तर देतातच शिवाय काही आहारातील पथ्ये पाळण्यास सांगतात त्यामध्ये सफरचंदाचा समावेश असतोच असतो. सफरचंद हे फळ लवकर खराब होत नाही. त्यामुळे आरोग्याबद्दल सजग राहणाऱ्या व्यक्ती त्याचा आहारात आवर्जून समावेश करतात.

सफरचंदामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, अशी खनिजे तर अ, ब, आणि क जीवनसत्त्वे असतात. चयापचय क्रियेसाठी आवश्यक असणारे मॅलिक अ‍ॅसिड हे देखील सफरचंदात विपुल प्रमाणात असते. सफरचंद हे रक्तशुद्धीकारक, पित्तशामक आणि शक्तिवर्धक आहे.

अनेक आजारांत किंवा स्थूलपणात शरीरात विषारी ग्रंथी तयार होतात. त्यांचे निष्कासन होणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह असते. सफरचंद फळामध्ये गॅलॅक्टुरॉनिक अ‍ॅसिड असते जे शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते.

सफरचंद कच्चे असताना त्याचा रंग हिरवा असतो. पूर्ण पिकल्यानंतर त्याचा रंग लाल होत जातो. कच्चे सफरचंद खूपच आंबट चवीचे असल्याने पिकल्यानंतरच ते खाणे सर्वांना आवडते. सफरचंद सालीसहित खावे कारण सालीमध्ये आतील गरापेक्षा जास्त प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्व असते.

सफरचंद फळामुळे मुखशुद्धी सुद्धा होते. सफरचंद फळात क जीवनसत्त्व असल्याने दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच दातांत आणि हिरड्यात असणारे जंतू नष्ट होतात. सफरचंद फळामध्ये अ जीवनसत्त्व असल्याने डोळ्यांचे आरोग्य देखील अबाधित राहते.

अशा या पौष्टिक आणि गुणकारी सफरचंदाचे सेवन म्हणजे मनुष्यासाठी उत्तम आरोग्याची प्राप्तीच आहे. सफरचंदाचे होणारे लाभ पाहून “दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा” अशी म्हण देखील तयार झालेली आहे. अशा सर्व प्रकारच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे सफरचंद हे माझे आवडते फळ आहे.

तुम्हाला माझे आवडते फळ – सफरचंद हा मराठी निबंध (Essay On Apple In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment