जागतिक परिचारिका दिन मराठी माहिती • World Nurses Day

प्रस्तुत लेख हा जागतिक परिचारिका दिन (World Nurses Day) याविषयी माहिती देणारा लेख आहे. हा दिवस १२ मे ला सर्वत्र साजरा केला जातो.

जागतिक परिचारिका दिन _ World Nurses Day

• परिचारिका ( नर्स ) ही व्यक्ती आपल्या अगदी ओळखीची असते. आपण जेव्हा वैद्यकीय मदत घेत असतो तेव्हा त्याठिकाणी आपल्याला रुग्णसेवा करत असलेल्या परिचारिका दिसतात.

• परिचारिका म्हणून काम करणारी स्त्री ही ममता भाव ठेवून रुग्णांची सेवा करत असते. हे काम अत्यंत समाजोपयोगी असल्याने त्याचा सन्मान म्हणून जागतिक स्तरावर परिचारिका दिन साजरा केला जातो.

• १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणारी परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे.

• जेथे जेथे परिचारिका काम करत असतात तेथे तेथे हा दिन अगदी सहजपणे साजरा केला जातो. परिचारिकेला योग्य तो सन्मान देऊन त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. शिवाय सांस्कृतिक कलेचा आविष्कार देखील काही ठिकाणी दाखवला जातो. सोशल मीडियाचा वापर करून सर्वत्र या दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात.

• 2019 मध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीत असंख्य लोकांनी आपले प्राण गमावले परंतु त्याहीपेक्षा कित्येक पटीने लोकांचे प्राण देखील वाचवले गेले. तेव्हा काम करणारे वैद्य आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या परिचारिका यांचे महत्त्व हे विषद करणे अशक्य आहे.

• सध्या परिचारिका म्हणून अनेक स्त्रिया आपले काम निवडत आहेत. परिचारिका म्हणून काम करून त्या रुग्णसेवा करत आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान होणे अत्यंत गरजेचे आहे आणि जागतिक परिचारिका दिन हा अगदी उत्साहात साजरा होणे आवश्यक आहे.

• समाजातील प्रत्येक घटक हा परिचारिका दिनाशी जोडला जाणे आवश्यक आहे तेव्हाच सर्वांना परिचारिकेची सेवा व महत्त्व समजण्यात मदत होईल.

तुम्हाला जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा …

Leave a Comment