कोरफड – मराठी माहिती • Korfad Marathi Mahiti •

प्रस्तुत लेख हा कोरफड (Korfad Marathi Mahiti) या वनस्पतीविषयी मराठी माहिती देणारा लेख आहे. कोरफड वनस्पतीची प्राथमिक माहिती, तिचे उपयोग व फायदे या लेखात सांगण्यात आलेले आहेत.

कोरफड वनस्पती माहिती मराठी • Korfad Vanaspati Marathi Mahiti •

• कोरफड ही सर्वसाधारणपणे एक औषधी वनस्पती आहे. कोरफडीला संस्कृतमध्ये कुमारी तर इंग्रजीत ॲलो (Aloe) असे म्हटले जाते.

• कोरफड ही वनस्पती दक्षिण भारतात रानटी अवस्थेतही आढळते. वेस्ट इंडीज देशात कोरफडीचे प्रमाण अत्यधिक आहे.

• कोरफड वनस्पती म्हणजे मजबूत पानांचा गुच्छ असतो. ते पान म्हणजे एक जाड, मांसल काटेरी दात असलेला भाग असतो. ते पान टोकदार असते. त्याचा रंग हिरवा असतो. कोरफडीचे खोड आखूड असून तिची मुळे खूप खोलवर रुजलेली नसतात.

• ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यांत पानांवर पिवळसर केशरी रंगाच्या फुलांचा फुलोरा येतो. फुलांचे बोंडे हे अनेकबीजी असतात.

• ॲलो कुळातील कोरफड ही एक प्रजात आहे. कोरफडीचा रस आरोग्यदायी असतो. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, फाॅलिक ॲसिड ई. घटक असतात आणि  झिंक, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असतात.

• कोरफडीचा समावेश रोजच्या आहारात झाल्यास शरीराला पोषक घटक मिळतात. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रस घेतला जावा असा सल्ला वैद्य देतात.

• कोरफडीमध्ये ॲलोईन, बार्बलाई, शर्करा, एन्झाईम व इतर औषधी रसायने असतात. ते सर्व घटक शारिरीक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी मदत करतात. ‘कुमारी आसव’ नामक औषध देखील कोरफडीपासून बनवले जाते.

• कोरफडीचा रस हा भूक वाढवतो. त्याची पाने ही रेचक, कृमिनाशक आहेत. तसेच ती पाने कडवट असतात आणि ती पाने थंडावा देखील प्रदान करतात.

• मानवी डोळे, यकृत, श्वासनलीका इत्यादी अवयवांच्या विकारांवर कोरफड उपयुक्त आहे. त्वचेच्या समस्या, भाजलेला भाग, हिमदाह इत्यादींसाठी कोरफडीचा गर वापरला जातो.

• चेहर्‍याच्या समस्या, सौदर्यप्रसाधनांत तसेच केसांच्या आरोग्यावर उपाय म्हणून कोरफड वापरली जाते.

तुम्हाला कोरफड – मराठी माहिती (Korfad Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment