सणाला किंवा सुट्टीच्या दिवशी काही गोडधोड जेवण केले तर श्रीखंड नक्कीच अशा जेवणात समाविष्ट असतो. श्रीखंड बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य अगदी अल्प आहे. प्रत्येक वेळी श्रीखंड विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरचे घरी श्रीखंड तयार करू शकता. चला तर मग पाहुयात श्रीखंड कसे बनवावे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने !
Table of Contents
Shrikhand Recipe Ingredients:
साहित्य:
• दही – १०० ग्रॅम
• साखर – १०० ग्रॅम
• वेलची पूड – अर्धा चमचा
• बदाम – पिस्ता – बारीक तुकडे
• पुरण यंत्र
• दूध ( केशर मिसळण्यासाठी थोडेसे पाव वाटी )
• केशर
How to make shrikhand ?
कृती:
• दही स्वच्छ कापडात घ्या. त्याला २ तास लटकवून ठेवा म्हणजे दह्यात असलेलं पाणी निघून जाईल.
• नंतर ते बिना पाण्याचं घट्ट बनलेल दही एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये साखर आणि वेलची मिक्सरमधून बारीक करून टाका.
• दही पुरणयंत्रातून फिरवून घ्या. व्यवस्थित फेटून झाल्यानंतर दही एकदम मुलायम झाले पाहिजे. त्यामध्ये आता बदाम, पिस्ता तुकडे टाका.
• एका दुसऱ्या भांड्यात दूध आणि केशर मिसळा. त्याला एकसंध रंग आला की त्यामध्ये मुलायम दही मिश्रण मिक्स करा.
• सर्व मिश्रण एकजीव करून फ्रिजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यानंतर खायला घ्या.
टिप – साखरेचे प्रमाण व्यवस्थित असू द्या. अति गोड श्रीखंड छान लागत नाही.