शेतकरी खरेदी – विक्री केंद्र उद्घाटन भाषण |

प्रस्तावना –

सर्वप्रथम मला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! येथे जमलेले सर्व मान्यवर लोक, इतर क्षेत्रातील पदाधिकारी, कृषी सेवा केंद्राचे मालक तसेच उपस्थित सर्व लोक अशा सर्वांना माझा नमस्कार!

कृषी सेवा केंद्र / शेतकरी खरेदी विक्री केंद्र – उद्घाटन भाषण

कोणताही व्यवसाय असो तो जर लोकांचे भले करत असेल, लोकांची मदत करत असेल तर त्याची भरभराट होणे निश्चित असते. लोकांचा विश्वास संपादन करून तो व्यवसाय करणारी व्यक्ती येणाऱ्या भविष्यात मोठी बनत असते. स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करत असते.

देशात हरितक्रांती झाल्यापासून कृषी सल्लागार आणि कृषी सेवा केंद्रांची गरज निर्माण झालेली दिसून येते. आपले महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य असल्याने कृषी संबंधित सर्व व्यवसाय हे विकास करतच असतात आणि करतही आहेत.

व्यवसायाचा प्रत्यक्ष फायदा हा शेतकऱ्यांना पोहचणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना लाभ पोहचला तर आपला शेतकरी वर्ग विकसित होऊ शकतो. शेतकरी वर्ग जर विकसित झाला तर आपला समाज व महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर जाऊ शकते.

शेती करण्याचा दृष्टिकोन हा फक्त उपजीविका पूर्ण होणे हा नसला पाहिजे तर त्यातून आपली आर्थिक वाढ देखील अपेक्षित आहे. आपण जी पिके पिकवतो आणि बाजारातील जी गरज आहे यातील अंतर जर कमी झाले तर आपला शेतकरी बांधव नक्कीच विकास करू शकतो.

आर्थिक संपन्नता प्राप्त होण्यासाठी शेतीविषयक योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. असे मार्गदर्शन मिळाले आणि तंत्रज्ञानाची योग्य साथ लाभली तर शेतकरी वर्ग सुखी होऊ शकतो.

कृषी सेवा केंद्र हे जर शेतकऱ्यांना लाभ पोहचवू शकले तर कोणताही शेतकरी आत्महत्या करण्याचा विचारही करणार नाही आणि सातत्याने प्रगती करतच राहील. त्यामुळे पुनश्च एकदा आपला समाज हा एक आर्थिक संपन्नता आणि स्थिरता प्राप्त करू शकेल.

शेवट –

उद्घाटनाच्या शुभप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आणि माझे विचार शांतपणे ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

Leave a Comment