संत तुकाराम बीज – मराठी माहिती | Sant Tukaram Beej Mahiti Marathi |

संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. संत तुकाराम बीज – मराठी माहिती (Sant Tukaram Beej Mahiti Marathi) या लेखात त्यांच्या पुण्यदिनाविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे.

संत तुकाराम बीज – माहिती मराठी | Tukaram Beej Information In Marathi |

• संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे तुकाराम बीज होय. फाल्गुन वद्य द्वितीया या दिनी संत तुकारामांचे वैकुंठ गमन झाले होते.

• सतराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत म्हणून संत तुकारामांची ओळख आहे. तथाकथित पंडित आणि पुरोहित यांच्या अयोग्य धार्मिक संकल्पनेला संत तुकारामांनी वाचा फोडली.

• तुकाराम महाराज यांचा जन्म माघ शुद्ध पंचमीला झाला होता. त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला परमात्मारूप मानून त्याची भक्ती – साधना केली होती.

• वारकरी संप्रदायातील लोक हे संत तुकाराम महाराज यांना “जगद्‌गुरु” मानतात. त्यांचे अभंग हे ज्ञान आणि भक्ती यांच्या संयोगातून झरलेली अमृत वचनेच आहेत.

• संत तुकाराम महाराज हे पंडित – पुरोहित यांसारखे तथाकथित ज्ञानी नव्हते तर ते एक उत्तम दार्शनिक होते. त्यांना जे निराकाराचे दर्शन झाले ते त्यांनी आपल्या अभंग कीर्तनातून मांडलेले होते.

• वेद – पुराण आणि अन्य धार्मिक ग्रंथ यांतील जे सार आहे त्यातून मनुष्याचा आंतरिक विकास व्हायला हवा अन्यथा दांभिकता वाढीस लागून अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांमध्ये लोक अडकत जातील अशी तुकाराम महाराजांची समज होती.

• आपले संपूर्ण जीवन भक्ती आणि ज्ञान मार्गाने व्यतित करून संत तुकाराम महाराज हे देहू या ठिकाणाहून गरुडावर बसून वैकुंठाला गेले, असा समज आहे.

• ज्या ठिकाणाहून संत तुकारामांचे वैकुंठ गमन झाले त्या ठिकाणी नांदुरकी नावाचा वृक्ष आहे. तुकाराम बीज या दिवशी बरोबर बारा वाजून दोन मिनिटांनी तो वृक्ष प्रत्यक्ष हलतो. त्याची अनुभूती अनेक वारकरी आणि भक्तगण घेतात.

संत तुकाराम बीज – मराठी माहिती (Sant Tukaram Beej Mahiti Marathi) हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

Leave a Comment