रंगपंचमी उत्सव – मराठी माहिती | Rangpanchami – Mahiti Marathi |

महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा रंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी! या लेखात रंगपंचमी या सणाबद्दल माहिती (Rangpanchami – Mahiti Marathi) देण्यात आलेली आहे.

रंगपंचमी माहिती मराठी | Rangpanchami Information In Marathi |

रंगपंचमी सणाचे महत्त्व –

• रंगपंचमी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जातो. एकेमकांना रंग लावत अगदी आनंदी मनाने सर्व बंधने झुगारून देत सर्व स्तरांतील सर्व लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.

• होळीनंतरच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला हा रंगोत्सव असल्याने याला रंगपंचमी असे म्हटले जाते. हिंदू संस्कृतीत या सणाला खूप महत्त्व दिले जाते कारण प्रत्येकजण भेदभाव विसरून, उदासी दूर करून या दिवशी एकमेकांना रंग लावण्यासाठी एकत्र येत असतात.

• उत्तर भारतात रंगपंचमी या सणाला “होली” असेच म्हटले जाते आणि तेथे हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. महाराष्ट्रात मात्र होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते.

• अगदी प्राचीन काळी भगवान श्रीकृष्ण हे राधा व इतर गोपिकांसोबत रंगपंचमी खेळत असत असा इतिहास आहे. त्यामुळे रंगपंचमी म्हटले की राधा – कृष्ण ही जोडी सर्वप्रथम पुजली जाते.

रंगपंचमी उत्सव कसा साजरा केला जातो?

• रंगपंचमी खेळण्यासाठी लोक कोरडे रंग अथवा ओले रंग वापरतात. विविध रंगांची पाकिटे विकत घेऊन त्यांचा वापर पाण्यात मिसळून करतात अथवा कोरड्या स्वरूपात एकमेकांना लावतात.

• काही ठिकाणी सार्वजनिक मेळावा भरवला जातो ज्यामध्ये पाणी व रंग उपलब्ध करून दिलेले असते. त्यावेळी सर्वजण बऱ्यापैकी संगीत लावून नाचतात आणि रंगपंचमी साजरी करतात.

• लहान मुले होळीपासूनच रंगपंचमी खेळायला सुरुवात करतात. रंगांची जमवाजमव, पिचकारी विकत घेणे, पाण्याच्या मोकळ्या बाटल्यांमध्ये आणि फुग्यांमध्ये रंग भरून ठेवणे अशा प्रकारची लगबग लहान मुलांची चाललेली असते.

• तरुण मुले – मुली शक्यतो न भिजता कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळणे पसंद करतात. सध्या मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध असल्याने सर्व तरुणाई सोशल मीडियावर स्टेटस ठेवून स्वतःची रंगपंचमी कशी साजरी झाली हे सर्वांना दाखवतात.

• वृध्द लोक अगदीच थोडा वेळ रंगपंचमी साजरी करतात. कुटुंबासमवेत थोडासा वेळ व्यतित करतात आणि गालावर थोडासा रंग लावून घेतात. सर्व वयोगटातील स्त्रिया ह्या सुरुवातीला रंग लावून घेण्याला तात्पुरता विरोध दर्शवतात.

रंगपंचमी खेळताना घ्यावयाची काळजी –

• रंगपंचमी उत्सव हा शक्यतो नैसर्गिक रंगांनी खेळावा. रासायनिक रंग वापरल्याने त्वचेवर परिणाम होऊ शकतो अथवा डोळ्यांना अशा रंगांचा त्रास जाणवू शकतो.

• अगदी बीभत्स आणि अयोग्य पद्धतीने रंग खेळणे टाळावे. जसे की एकमेकांच्या अंगावर तेलरंग लावणे, अंडी फोडणे, नाकातोंडात रंग चारणे, राख अथवा चिखलफेक करणे अशा गोष्टी टाळल्या तर आपण एका उत्तम सणाचे औचित्य साधून आपल्या जीवनात आनंदाची वृद्धी करू शकतो.

रंगपंचमी – मराठी माहिती (Rangpanchami Mahiti Marathi) हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी तुमचा महत्त्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

Leave a Comment