प्रजासत्ताक दिन भाषण [2023] • Republic Day Speech in Marathi •

प्रस्तुत लेख हा प्रजासत्ताक दिनाविषयी मराठी भाषण (Republic Day Essay in Marathi) आहे. या भाषणात प्रजासत्ताक दिनाचा इतिहास, महत्त्व, आणि तो कसा व का साजरा केला जातो याचे विस्तृत वर्णन केलेले आहे.

प्रजासत्ताक दिन – मराठी भाषण | Prajasattak Din Bhashan Marathi

अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व येथे जमलेले सर्व विद्यार्थी व नागरिक अशा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार!

२६ जानेवारी ही तारीख आपण प्रजासत्ताक दिन म्हणून संपुर्ण देशभर साजरी करतो. या दिवशी प्रत्येक भारतीय हा देशासाठी अभिमानाची भावना बाळगतो. २६ जानेवारी या दिवशीचा इतिहास काय आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊयात.

भारताच्या संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाला मान्यता दिली. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले.

भारतीय राज्यघटना संपूर्ण देशभर अंमलात आलेला दिवस म्हणून २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण देशात ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली जाते.

भारताला एक संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र म्हणून या दिवसापासून कायदेशीरदृष्ट्या चालना मिळाली. अनेक महत्त्वाचे कायदे आणि नियम आपल्या देशात लागू करण्यात आले. या दिवसापासून भारताला एक अशी कायदेप्रणाली मिळाली जी संपूर्ण देशवासीयांच्या जीवनाला प्रेरित करणारी होती.

दरवर्षी २६ जानेवारी दिवशी प्रत्येक सरकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत असतो. यावेळी तेथील कर्मचारी हा संपूर्ण कार्यक्रम पूर्णत्वास नेत असतात. शाळा – महाविद्यालयांत सर्व विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ – नागरिक या सोहळ्यात सामील होत असतात.

भारतीय सुरक्षा दल संचलन आणि विविध प्रादेशिक विभाग व राज्ये यांचे सांस्कृतिक संचलन यावेळी होत असते. भारतीय राष्ट्रपती या सर्व संचलनकर्त्यांची मानवंदना स्वीकारतात.

२६ जानेवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिनाला राष्ट्रीय दिन म्हणून स्थान दिले गेले आहे.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. संपुर्ण भाषण ऐकल्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

तुम्हाला प्रजासत्ताक दिन हे मराठी भाषण (Republic Day Speech in Marathi) आवडले असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment