ram jethmalani

गेल्या दोन आठवड्यांपासून आजारी असलेले देशाचे सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते देशातील सर्वोत्तम वकील होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याच मोठ्या केसेस लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. राम जेठमलानी ज्येष्ठ वकील तसेच माजी केंद्रीय कायदा मंत्री सुद्धा होते.

पाकिस्तान ते भारत थक्क करणारा प्रवास-

राम जेठमलानी यांचा जन्म १ सप्टेंबर १९२३ रोजी पाकिस्तानच्या शिकारपूर (त्यावेळी भारताचा भाग) येथे झाला. अभ्यासात ते खूप गुणवंत होते. त्यांनी एकाच वर्षात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्गाचे शिक्षण पूर्ण केले होते. विशेष म्हणजे ते केवळ 13 वर्षांचे असताना मॅट्रिक उत्तीर्ण झाले.

जेठमलानी यांचे वडील बोलचंद गुरमुख दास जेठमलानी आणि आजोबासुद्धा वकील होते. कदाचित याच कारणास्तव ते वकिलीच्या व्यवसायाकडे झुकले. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर गोष्टी आणखी बिघडू लागल्या आणि राम जेठमलानी मित्राच्या सल्ल्यावर मुंबईला आले.

राम जेठमलानी यांना वयाच्या १७ व्या वर्षी कायद्याची पदवी मिळाली. १९९५ मध्ये महाराष्ट्रातील केएम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र या पहिल्या प्रकरणातूनच ते चर्चेत आले. जेठमलानी यांनी मुंबई आणि दिल्ली न्यायालयातील अनेक तस्करांच्या खटल्याची बाजू मांडली.

सर्वात महागडे वकील-

आपल्या युक्तिवादाच्या जोरावर, त्यांनी बहुतेक केसेस जिंकल्या. ७० आणि ८० च्या दशकात ते वकील म्हणून खूप प्रसिद्ध झाले. असे म्हणतात की राम जेठमलानी खूप हट्टी होते. ते कोणत्याही परिस्थितीत माघार घेत नसत. त्यामुळे ते बऱ्याच केसेस जिंकले.

ते स्वतंत्र भारतातील सर्वात महागड्या वकीलांपैकी एक होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांची फी १ कोटी रुपयांवर गेली होती. त्यावेळी त्यांना खटला सोपवणे म्हणजे खटला जिंकल्यासारखे होते. त्यामुळेच त्यांची फी सर्वात जास्त होती. त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे एक Private Jet होते.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरातील कोणताही वकील आरोपी सतवंतसिंग आणि केहर सिंह यांच्या बाजू मांडण्यास तयार नव्हता. त्यावेळी राम जेठमलानी यांनी हा खटला हातात घेतला होता.

मुंबईच्या डॉन हाजी मस्तानच्या बर्‍याच घटनांमध्ये राम जेठमलानी यांनी वकिली केली. त्याशिवाय त्यांनी उपहार सिनेमाच्या अग्नीतील आरोपींच्या मालकांच्या व 2 जी घोटाळ्यातील द्रमुक नेते कनिमोझी यांच्या वतीने वकिली केली होती. इतकेच नाही तर प्रसिद्ध सोहराबुद्दीन चकमकी प्रकरणात जेठमलानी अमित शहाच्या वतीने कोर्टात हजर झाले होते.

चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा खटला सुद्धा त्यांनीच लढला होता. सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांच्यासाठी जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती आणि जेठमलानी यांनी संसदेवरील हल्ल्यात फाशी झालेल्या अफझल गुरूचा खटला लढला होता, ज्यामुळे त्यांच्यावर टीका हि झाली.

हे सुद्धा वाचा- सुषमाजींनी साळवेंना पाठवलेल्या त्या मॅसेजने केलं सर्वांना भावुक…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here