पीपीई किट म्हणजे काय? PPE kit In Marathi |

पीपीई किट म्हणजे काय? (PPE kit in Marathi) हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. कोरोना काळात सर्वत्र पीपीई किटचा उल्लेख होत आहे. आरोग्य क्षेत्रात, अति संवेदनशील कामात किंवा अति जोखमीच्या कामात पीपीई किटचा वापर केला जातो. चला तर मग विस्तारपूर्वक पाहुयात काय आहे हे पीपीई किट!

PPE – Personal Protective Equipment
(वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे)

पीपीई म्हणजे संरक्षक कपडे, हेल्मेट, चष्मा, हातमोजे, संरक्षक मास्क आणि बूट ज्याद्वारे आपण शरीराचा संसर्गापासून आणि दुखापतीपासून बचाव करू शकतो.

शरीराची इंद्रिये जी कामं करतात उदा. श्वास घेणे, बघणे, चव कळणे, स्पर्श जाणवणे, इ. कामेच जर संसर्गजन्य वातावरणात झाली तर शरीराला आंतरिक आणि बाह्य ईजा पोहचू शकते.

डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक, सेवा रक्षक नेहमीच काम करताना पीपीई किट परिधान करून असतात. शरीराला कोणताही धोका किंवा संसर्ग होऊ नये, असा त्यामागचा उद्देश्य असतो.

भौतिक, आरोग्य, विद्युत, उष्णता, रसायने, अशा बाबींद्वारे मानवी शरीराला धोका पोहचू शकतो. त्यामुळे मानवी आरोग्याचा हेतू समोर ठेवून वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे बनवली जातात.

ज्या क्षेत्रात वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरली जातात त्यानुसार त्याचे प्रकार पडतात. अभियांत्रिकी क्षेत्रातील पीपीई किट शरीराला दुखापत होऊ नये त्या दृष्टीने बनवली जातात तर वैद्यकीय क्षेत्रातील पीपीई किट संसर्गापासून वाचण्यासाठी बनवली जातात.

शरीराच्या ज्या अवयवाचा स्पर्श किंवा संपर्क होणार आहे तेथे संरक्षण उपकरण परिधान केले जाते. हातमोजे, मास्क, बूट, चष्मा, संरक्षक कपडे अशा वस्तूंचा वापर केला जातो.

पीपीई किटचे फायदे –

• प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्ग होत नाही.
• शारिरीक दुखापत किंवा ईजा होत नाही.
• सुरक्षित वातावरणात काम करता येते.

पीपीई किटचे तोटे –

• शरीराला मोकळ्या हवेचा कमी स्पर्श.
• जास्त काळ पीपीई किट परिधान करणे नुकसानकारक.

पीपीई किट वापरताना घ्यावयाची काळजी –

• पीपीई किट नेहमी स्वच्छ असावे.
• एका व्यक्तीने वापरलेले पीपीई किट दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये.

कोरोना काळातील पीपीई किट –

पीपीई किटमुळे कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यास मदत झालेली आहे. डॉक्टर्स, पोलिस, सेवा यंत्रणा सर्वजण पीपीई किट परिधान करून वावरत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवकांना कोरोनाचा धोका कमी आहे.

कोविड केअर सेंटर उभारले गेले असता तेथील कर्मचाऱ्यांना पीपीई किट परिधान करणे अनिवार्य आहे. कोरोना बाधित रुग्णाला हाताळताना तर सुरक्षा आणि काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरणे गरजेचेच आहे.

तुम्हाला पीपीई किट म्हणजे काय? (PPE kit In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment