पतसंस्था उद्घाटन भाषण • Patsanstha Udghatan Bhashan •

प्रस्तुत लेख हा पतसंस्था उद्घाटन भाषण (Patsanstha Udghatan Bhashan) याविषयीचा मराठी लेख आहे. पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात येणाऱ्या भाषणाची विस्तृत स्वरूपाची मुद्देसूद माहिती या लेखात दिलेली आहे.

पतसंस्था उद्घाटन भाषण | Pat sanstha Udghatan Bhashan (Welcome Speech)

मी ज्ञानराज उदयभान जाधव. मला पतसंस्थेच्या उद्घाटनाची संधी दिलीत त्याबद्दल मी पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळाचे तसेच पतसंस्थेशी निगडित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि भाषणाला सुरुवात करतो.

आपण बचत करण्यासाठी बँकेचा पर्याय निवडत असतो. त्याप्रमाणेच पतसंस्थेतदेखील आपण आपली बचत करू शकतो.

बँकेप्रमाणे सहकारी पतसंस्था या देखील कर्जपुरवठा करत असतात. सभासद असलेल्या लोकांची आर्थिक गरज भागवत असतात. त्यामुळे अत्यंत प्रभावी आणि लोकोपयोगी कार्य हे पत संस्थेमार्फत होत असते, याची जाणीव सर्वांना असायला हवी.

ग्रामीण विभाग, शहरी व निमशहरी विभाग अशा सर्व स्तरांतील लोकांना पतपुरवठा व्हावा या उद्देशाने पतसंस्था निर्मिती होत असते. अडीअडचणीच्या काळात कुटुंबांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी पतसंस्था कधीही मदतीसाठी तयारच असते.

या संस्थेचे संस्थापक, संचालक यांची पतसंस्थेविषयी असणारी जबाबदारी देखील तेवढीच महत्त्वपूर्ण पद्धतीची असते. सर्व सभासद व पदाधिकारी यांनी स्वतःची ओळख व कार्य ओळखून या पतसंस्थेच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

सहकारी पतसंस्था या मदत, जबाबदारी, लोकशाही, एकता, समानता अशा मूल्यांवर आधारित असल्याने तेथील नियम व अटी या सर्वांनाच लागू होतात. तेथील नियमांची अमंलबजावणी सर्वांमार्फत व्हावी आणि पतसंस्था ही भविष्यात देखील विकसित होत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना!

अशा सर्व बाबींचा विचार केल्यावर एखादी पतसंस्था निर्माण होणे हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल. तर आजच्या उद्घाटन प्रसंगी सर्व सभासदांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

तसेच सर्वांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होऊन व्यक्ती व कुटुंबाचा विकास हा येणाऱ्या काळात या पतसंस्थेमार्फत व्हावा ही सदिच्छा! मी पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून भाषण संपवतो! नमस्कार!

तुम्हाला पतसंस्था उद्घाटन भाषण (Patsanstha Udghatan Bhashan) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment

close