Paneer Paratha Recipe in Marathi | पौष्टिक पनीर पराठा रेसिपी !

पराठा बनवणे खूपच सोपे आहे. वेगळी भाजी न बनवता फक्त पनीर पराठा बनवून तुम्ही मस्तपैकी पोटभरून आस्वाद घेऊ शकता. पनीर पराठा हा उत्तर भारतात जास्त बनवला जातो परंतु त्याची सर आता सर्वच ठिकाणी येत आहे. पनीर पराठा बनवण्यासाठी अत्यल्प साहित्य आवश्यक आहे.

Paneer Paratha Recipe Ingredients

साहित्य –

• पनीर – २५० ग्रॅम
• गव्हाचे पीठ – ३ वाटी
• तेल – गरजेनुसार
• लाल तिखट – १ चमचा
• हळद – पाव चमचा
• जिरे – बारीक करून 
• धने – बारीक करून 
• मीठ – चवीनुसार
• कोथिंबीर – बारीक चिरून 

How to make paneer paratha ? 

कृती –

१ – पनीर किसणीवर किसून घ्यावे. त्यामध्ये जिरे, धने बारीक करून टाकावे. हळद आणि लाल तिखट गरजेनुसार टाकावे. 
२ – आता मीठ, कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यावे. थोडेसे तेल हातावर लावून मिश्रण पुन्हा एकदा मळावे.
३ – एका परातीत किंवा भांड्यात गव्हाचे पीठ पाणी टाकून मळून घ्यावे. चपाती बनवतो तसे बारीक गोळे करून घ्यावेत. 
४ – पनीर मिश्रण आता सारण म्हणून वापरावे. चपातीचा गोळा लाटून घ्यावा. त्यामध्ये हे सारण टाकून पुन्हा एकदा गोळा बनवावा. व्यवस्थित लाटून घेऊन नॉनस्टिक तव्यावर तेलात भाजून घ्यावा.

टीप – पनीर मिश्रण खूप सैल किंवा घट्ट मळू नये.

Leave a Comment