ओटीटी – मराठी माहिती | OTT Meaning In Marathi |

प्रस्तुत लेख हा ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल मराठी माहिती (OTT Information In Marathi) आहे. OTT म्हणजे काय, OTT सेवेचे फायदे व उपयोग अशा सर्व बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

OTT म्हणजे काय? OTT Meaning in Marathi

OTT म्हणजे Over-The-Top (ओवर द टॉप) सेवा.

इंटरनेटचा वापर करून आपण ओटीटी या व्हिडिओ स्ट्रीमींग सेवेचा लाभ घेऊ शकतो. पूर्वी टीव्ही चॅनल्स किंवा थिएटर मध्येच आपल्याला नवनवीन मनोरंजनाचा लाभ घेता येत होता परंतु आता ओटीटीमुळे ऑनलाईन मनोरंजन उपलब्ध होत आहे.

ओटीटीवर आपण चित्रपट किंवा वेब सीरिज पाहू शकतो. सध्या तर इतरही मनोरंजन जसे की स्पोर्ट्स सीरिज, किड्स सीरिज, इंटरव्ह्यूज अशा प्रकारचे कार्यक्रम देखील ओटीटी वर प्रदर्शित होत असतात.

टीव्हीवर चॅनल्स आणि चित्रपट पाहताना आपल्याला जाहिरात आणि अतिरिक्त शुल्काचा भार सहन करावा लागतो. त्याशिवाय वेळेचे महत्त्वपूर्ण बंधन अशावेळी पाळावे लागते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण सबस्क्रिप्शन घेऊन कोणत्याही वेळेत व्हिडिओज, चित्रपट आणि वेबसीरिज पाहू शकतो.

ओटीटी ऍप | OTT Apps in Marathi

OTT apps आपण मोबाईल अथवा स्मार्ट टीव्हीवर डाउनलोड करू शकतो. यामध्ये प्रसिद्ध टीव्ही चॅनल्सची ऍप्स असतात ज्यांवर आपण मालिका, रिऍलिटी शोज आणि चित्रपट यांचा लाभ घेऊ शकतो.

OTT apps चा फायदा म्हणजे आपल्याला हवे तेव्हा आपण टेलिव्हिजन कंटेंट पाहू शकतो. सबस्क्रिप्शन घेतल्याने आपल्याला जाहिराती शिवाय कंटेंट पाहता येतो.

काही ओटीटी कंटेंट जाहिरातीसह असतो आणि तशा प्रकारचे सबस्क्रिप्शन देखील आपण निवडू शकतो. बहुतांश वेळा ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांच्या वेबसीरिजमुळे प्रसिद्ध होत असतो.

मराठीत सध्या प्लॅनेट मराठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. त्याशिवाय
भारतातील OTT Platforms ची लिस्ट खाली दिलेली आहे.

Amazon Prime Video
ALTBalaji
Arre
Disney + Hotstar
Eros Now
MX Player
Netflix
Sony Liv
Voot
Zee5

OTT चे फायदे – Benefits of OTT in Marathi

इंटरनेट नसताना आपल्याला प्रसिध्द टीव्ही शोज, चित्रपट आणि मालिका पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स आणि d2h सेवेची गरज भासत असे परंतु ओटीटीमुळे इंटरनेटचा वापर करून तोच सर्व कंटेंट आपण स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर कोणत्याही उपकरणाशिवाय पाहू शकतो.

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रसिद्धीमुळे विशिष्ट प्रकारचे टीव्ही शोज आणि वेब सीरिज थेट आपल्याला मोबाईलवर देखील पाहता येऊ शकतात. ओटीटीमुळे कोणत्याही वेळेत आणि कोणत्याही ठिकाणी आपण आवडीनिवडी नुसार आपल्याला हवा तो कंटेंट पाहू शकतो.

ओटीटी सेवेचे प्रकार | Types Of OTT in Marathi

1. Advertising Video On Demand (AVOD)

या ओटीटी प्रकारामध्ये जाहिराती समाविष्ट केलेल्या असतात. व्हिडिओज पाहताना त्याबरोबर अधूनमधून जाहिरात देखील पहावी लागते.

2. Transactional Video On Demand (TVOD)

या ओटीटी प्रकारात चित्रपट, शो अथवा सीरिज फक्त एकदा पाहण्यासाठी उपलब्ध केलेली असते. त्यासाठी साधारण शुल्क आकारले जाते.

3. Subscription Video On Demand (SVOD)

या ओटीटी प्रकारात प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेऊन आपल्याला हवे तेव्हा व्हिडिओज पाहता येतात. त्यासाठी मासिक किंवा वार्षिक शुल्क भरावे लागते.

तुम्हाला ओटीटी – मराठी माहिती (OTT Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment