ओमायक्रॉन विषाणू – कोरोनाचा नवा प्रकार | Omicron Mahiti Marathi |

कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन (Omicron) हा नवीन प्रकार सध्या जगभरात वेगाने पसरतो आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल, विषाणूची लागण झाल्यास त्याची लक्षणे काय असतील, अशा बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार –

सर्वप्रथम बोत्सवाना या देशात ओमायक्रॉन हा विषाणू आढळून आला त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत त्याचा होणारा प्रसार खूप वाढलेला दिसून आला. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया आणि जोहान्सबर्गमध्ये ओमायक्रॉनची प्रकरणे वाढली आहेत. नव्या माहितीनुसार तब्बल 23 देशांत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव झालेला आहे.

संसर्गाची तीव्रता अजुन निश्चित झालेली नसल्याने सर्व देश दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पहिल्या दोन आठवड्यात नवीन रुग्णांमध्ये चार पटीने वाढ झालेली आढळली आहे.

दक्षिण आफ्रिका देशातील ओमायक्रॉनच्या प्रसाराबाबत 24 नोव्हेंबर 2021 रोजी प्रथमच WHO (World Health Organization) ला कळवण्यात आलं होतं.

ओमायक्रॉन : काय आहेत लक्षणे?
Symptoms of Omicron variant in Marathi

कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमायक्रॉन हा प्रकार जास्त धोकादायक आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार या विषाणूच्या प्रकारात अपरिचित लक्षणे दिसून येत आहेत.

दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी म्हणतात की उच्च ताप, जास्त थकवा, सौम्य स्नायूदुखी, घसा खवखवणे आणि कोरडा खोकला अशी सुरुवातीची लक्षणे आढळली आहेत. लोकांना डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास सुद्धा सहन करावा लागला आहे. प्राथमिक लक्षण हे तीव्र थकवा आहे.

ओमायक्रॉन : कशी घ्यायची काळजी?
Omicron Precautions in Marathi

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असणाऱ्या व्यक्तींना ओमायक्रॉनचा धोका जास्त संभवतो. कोरोना विषाणूसाठी घेतली जाणारी काळजी हीच सातत्याने पुढे चालू ठेवायची आहे. लसीकरण झाले असले तरी हा विषाणू जास्त प्रभावशाली असल्याने काळजी न घेता फिरणे म्हणजे धोका पत्करणे, असेच होईल.

ओमायक्रॉन हा विषाणू चाळीसपेक्षा कमी वय असलेल्या लोकांवर प्रभाव टाकत आहे. त्यामुळे तरुण पिढीने देखील असे समजू नये की त्यांना ओमायक्रॉनची लागण होऊ शकत नाही. सुरक्षित अंतर ठेवणे, नियमित हात धुणे, बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लसीकरण करून घेणे असे काही नियम पुन्हा एकदा पाळावे लागतील.

Leave a Comment