डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १० ओळी निबंध | Dr. Ambedkar 10 Oli Nibandh |

प्रस्तुत लेख हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Bababsaheb Ambedkar 10 Oli Nibandh) यांच्या जीवनावर आधारित 10 ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात त्यांच्या जीवन कार्याविषयी अत्यंत मुद्देसूद पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर – १० ओळी मराठी निबंध | Dr. B. R. Ambedkar 10 Lines Essay In Marathi |

१. भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलितांचे नेते, कायदेपंडित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर व्यक्तिमत्व होते.

२. डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण नाव भिमराव रामजी सकपाळ असे होते. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार होते.

३. मध्यप्रदेशमधील महू या ठिकाणी १४ एप्रिल १८९१ रोजी आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकर सहा वर्षांचे असताना त्यांची आई भीमाबाई यांचे निधन झाले.

४. आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. याच काळात त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला.

५. १९१३ मध्ये आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम. ए. व पीएच. डी. ह्या पदव्या प्राप्त केल्या.

६. १९२३ साली आंबेडकर यांनी लंडन विद्यापीठाची डी. एससी. ही पदवी प्राप्त केली. भारतात माघारी आल्यानंतर त्यांनी मुंबईत वकीली सुरू केली.

७. १९२४ मध्ये दलितांच्या हक्कांसाठी डॉ. आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था स्थापन केली.

८. स्वतंत्र भारताच्या संविधान समितीत सभासद आणि अध्यक्षपदी राहून आंबेडकर यांनी सुमारे तीन वर्षांच्या मेहनतीनंतर संविधानाचा मसुदा तयार केला.

९. अस्पृश्यांच्या समस्या कायमच्या दूर करण्यासाठी धर्मांतर करणे आवश्यक आहे हे आंबेडकर यांनी जाणले होते. आपल्या हजारो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

१०. संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि पीडितांच्या प्रश्नांसाठी लढणारा हा महामानव ६ डिसेंबर १९५६ रोजी अनंतात विलीन झाला.

तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा 10 ओळींचा मराठी निबंध (Dr. Bababsaheb Ambedkar 10 Oli Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment