कोरोना – ओमायक्रॉनची लक्षणे | Corona Omicron Symptoms in Marathi

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात संपूर्ण यश आलेले नसले तरी बहुतांश पद्धतीने मानवाने जगण्याची पद्धत नव्याने निर्माण केलेली आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे.

कोरोना विषाणू हा पूर्वीच्या स्वरूपात नाही, तर यावेळी तो अत्यंत घातक स्वरूपात परतला आहे. यापूर्वी कोरोना विषाणूचा डेल्टा हा प्रकार होता परंतु सध्या तो ओमायक्रॉन या रूपात आलेला आहे.

कोविड 19 – ओमायक्रॉनची लक्षणे – Symptoms of Omicron Virus in Marathi

कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमायक्रॉन हा प्रकार जास्त धोकादायक आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. तरुण आणि वयोवृध्द अशा दोन्ही वयोगटातील लोकांना ओमायक्रॉन विषाणूचा धोका संभव आहे.

दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी म्हणतात की उच्च ताप, जास्त थकवा, सौम्य स्नायूदुखी, घसा खवखवणे आणि कोरडा खोकला अशी सुरुवातीची लक्षणे आढळली आहेत.

१. उच्च ताप –

कोरोना ओमायक्रॉन या प्रकारात उच्च ताप हे लक्षण दिसून आलेले आहे. प्रत्येक मानवी शरीरात विषाणूची बाधा झाल्यावर तापमान कमी जास्त होत असते. यामध्ये ओमायक्रॉन विषाणूची बाधा होणे म्हणजे शरीराचे तापमान नक्कीच वाढलेले जाणवते.

२. जास्त थकवा –

ताप आल्यानंतरचे दुसरे लक्षण म्हणजे शारीरिक थकवा जास्त प्रमाणात जाणवत आहे. काहीही करावेसे न वाटणे, आणि शारीरिक दुर्बलता वाटणे, असे काही रुग्णांच्या अभ्यासानंतर आढळून आले आहे.

३. घसा खवखवणे –

कोरोना ओमायक्रॉन विषाणूमुळे घसा खवखवतो. कोरोना विषाणूचे प्राथमिक लक्षणच घसा खवखवणे हे आहे. गिळायला त्रास होणे तसेच श्वासो्छ्वास करताना गळ्यात दुखणे असे प्रकार समोर आलेले आहेत.

४. कोरडा खोकला –

कोरडा खोकला हे ओमायक्रॉन विषाणूचे आणखी एक लक्षण आढळून आलेले आहे. ओमायक्रॉन विषाणू बाधा झालेल्या रुग्णांमध्ये कोरडा खोकला जास्त दिवस टिकून राहतो. कोरडा खोकला जास्त काळ असल्यास लगेच वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

५. सौम्य स्नायू दुखी –

बहुतेक वेळा स्नायू दुखी आपल्याला उद्भवत नाही. परंतु कोरोना ओमायक्रॉन या विषाणू ने शरीरात शिरकाव केल्यास स्नायू दुखी उद्भवू शकते. ही स्नायू दुखी अत्यंत गंभीर स्वरूपाची नसते तर सौम्य प्रकारची असते.

ओमायक्रॉन विषाणूने बाधित लोकांना डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास सुद्धा सहन करावा लागला आहे, परंतु प्राथमिक लक्षण हे तीव्र थकवा आहे.

काळजी –

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर ठेवणे, नियमित हात धुणे, अशाच स्वरूपाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने कळवले आहे.

दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव सर्वात जास्त जाणवलेला आहे. त्यामुळे तेथील लोक कशा प्रकारे या विषाणूचा सामना करतील हे पाहावे लागेल. हा नवीन विषाणू आढळल्यानंतर लगेचच जागतिक आरोग्य संघटनेला त्याबाबत दक्षिण आफ्रिकेतून माहिती देण्यात आलेली आहे.

दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार या विषाणूच्या प्रकारात अपरिचित लक्षणे दिसून येत आहेत, त्यामुळे पुढील संशोधन आणि संसर्गाची तीव्रता अभ्यासल्यानंतर सविस्तर माहिती आणि उपचार पद्धती कळू शकते.

Leave a Comment