राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी – मराठी माहिती | NDA Information In Marathi |

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी माहिती (NDA Information In Marathi) हा लेख राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परीक्षा, प्रवेश आणि संरक्षण क्षेत्रातील संधी याबद्दल सर्व माहिती देणारा लेख आहे. १९५४ साली पुण्यात या प्रबोधिनीची स्थापना झाली. येथे भूदल, वायुदल, आणि नौदल या तिन्ही दलाचे प्रशिक्षण दिले जाते.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी | National Defence Academy |

भारत स्वतंत्र झाल्यानंतर परकीय आक्रमण होऊ नये आणि देशांतर्गत हिंसाचाराला आळा बसावा यासाठी एका मजबूत संरक्षण व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली.

संरक्षण व्यवस्थेअंतर्गत भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत सशस्त्र सेना, संरक्षण उत्पादन विभाग आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था हे तीन विभाग आहेत.

• भारतीय सशस्त्र सेना (Indian Armed Forces)

• संरक्षण उत्पादन विभाग (Department of Defence production)

• संरक्षण संशोधन व विकास संस्था (Defence Research and Development Organisation)

वरील तिन्ही विभागात एनडीएच्या माध्यमातून प्रवेश घेता येतो.

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये काम करणारे अधिकारी तयार करण्याचे काम नॅशनल डिफेन्स अकॅडमी, पुणे तर्फे केले जाते.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश कसा मिळवता येतो? NDA Admission Process In Marathi

एनडीएमध्ये बारावीनंतर प्रवेश घेता येतो. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी एनडीए प्रवेशपरीक्षा द्यावी लागते.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) वर्षातून दोन वेळा एनडीए प्रवेशपरीक्षा घेत असते.

ही प्रवेशपरीक्षा एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये होत असते. त्यासाठी साधारणतः जून आणि डिसेंबर मध्ये अर्ज भरण्यासाठी नोटिफिकेशन जाहीर केले जाते.

ही प्रवेशपरीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असते. यामध्ये दोन पेपर असतात.
१. गणित (३०० गुण)
२. सामान्य क्षमता चाचणी (६०० गुण)

मुंबई आणि नागपूर या दोन केंद्रांवर एनडीए प्रवेशपरीक्षा घेतली जाते. एनडीए प्रवेश परीक्षेसाठी वयोमर्यादा (Age Limit For NDA) १६.५ – १९ वर्षे दरम्यान आहे.

एअरफोर्स व नेव्हीसाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी बारावी(विज्ञान) भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असते.

एनडीए निवड प्रक्रिया | NDA Selection Process |

✓ केंद्रीय लोकसेवा आयोग प्रवेशप्रक्रिया.
✓ सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखत. (९०० गुण)
✓ वैद्यकीय चाचणी.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची मुलाखत असते. संपूर्ण मुलाखतीत मानसिक चाचणी, समूह कामगिरी व वैयक्तिक मुलाखत घेतली जाते.

त्यानंतर उमेदवारांची सेना वैद्यकीय अधिकारी बोर्ड यांच्याकडून वैद्यकीय चाचणी घेण्यात येते.

वैद्यकीय चाचणी आणि आर्मी नेव्ही एअरफोर्स मुख्यालय मुलाखत यांद्वारे अंतिम गुणवत्ता यादी बनवली जाते.

उपलब्ध जागांनुसार निवड झालेल्या उमेदवारांना एनडीए प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे पत्र पाठवतात.

एनडीए प्रशिक्षण | NDA Training |

तीन वर्षांचा जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम उमेदवारांकडून अभ्यासून घेतला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट सेवेनुसार पुढील विशेष प्रशिक्षणासाठी एका वर्षाकरिता उमेदवारांना नियुक्त केले जाते.

विशेष प्रशिक्षण खाली दिलेल्या तीन अकॅडमीमध्ये आपापल्या सेवेनुसार पूर्ण केले जाते.

• आर्मी कॅडेट इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून.

• नेव्ही कॅडेट इंडियन नेव्हल अकॅडमी, कोची.

• एअरफॉर्स कॅडेट इंडियन एअरफोर्स अकॅडमी, हैदराबाद.

पदवी अभ्यासक्रम तीन वर्षे आणि विशेष प्रशिक्षण एक वर्ष अशा प्रकारे एकूण चार वर्षांचे प्रशिक्षण एनडीएमध्ये असते.

संरक्षण सेवेत रुजू होण्यासाठी पदवीपात्र उमेदवारांना देखील संधी असते त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त संरक्षण सेवा परिक्षा (Combined Defence Services) उत्तीर्ण करावी लागते.

तुम्हाला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी माहिती (NDA Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की आम्हाला तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Leave a Comment