सुखी कुटुंबाचे रहस्य (इतरांबद्दल बोलताना) | Happy Family Secret In Marathi |

कुणाल फोनवरून सांगत होता, बराच वेळ बोलत होता. त्याच्या सांगण्यात एक गोष्ट वारंवार झळकत होती ती म्हणजे त्याच्या घरचे कसे काय चुकतात आणि त्याचा मुद्दा कसा काय बरोबर आहे.

कुणाल हा उच्च शिक्षित तरुण, त्याची जबाबदारी त्याने तितकीशी न सांभाळता अरेरावी करतच आत्तापर्यंत जगत आला होता. कुटुंबीय त्याला तितकेसे बोलू शकत नव्हते कारण तो स्वतःच्या कामात आणि वागण्यात नेहमी प्रामाणिक असे.

वरील उदाहरणात आपल्याला असे कळून येईल की फक्त कुणालच नाही तर तसे प्रत्येक व्यक्तीबरोबर घडत असते. कुणालचे मत बरोबर असेलही, पण कुटुंबात एकत्र बसून कधी त्याला वाटणारे मुद्दे त्याने मांडले होते का? इतरांचीही मते जाणून घ्यायचा प्रयत्न केला का? अशा प्रश्नांची उत्तरे जर नाही असतील तर पुढील मुद्द्यांवर नक्की विचार करा.

सुखी कुटुंबाचे रहस्य | Secrets of Happy family Relationships

  • संपूर्ण जगात एकही व्यक्ती अशी भेटणार नाही जी तुमच्या मताप्रमाणे जगेल. मग दुसऱ्यांनी असे वागले पाहिजे, तसे काम केले पाहिजे, असा अट्टाहास का धरायचा?
  • तुमचे मत हे तुमच्या अनुभवावर आधारित असते. त्यामुळे तुम्ही इतरांशी वागण्याचा आणि स्वतः जगण्याचा एक मापदंड ठरवलेला असतो. तो मापदंड तुमच्या स्वतःच्या आणि इतरांच्या फायद्याचा आहे की नाही, ते सर्वप्रथम पाहिले पाहिजे.
  • तो मापदंड सर्वांच्या फायद्याचा असेल, कुटुंबाचे त्याने भले होणार असेल तर तो एकत्र बसून चर्चिला गेला पाहिजे. मग सर्वांनी कुटुंबात करावयाची कामे किंवा जबाबदाऱ्या ठरवल्या पाहिजेत. असे केल्याने कोणालाच असे वाटणार नाही की, मीच कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे, मीच कुटुंबासाठी सर्वकाही करतो.
  • कुटुंबात राहताना अहंकार आणि कामचुकारपणा नसला पाहिजे. जबाबदारीची जाणीव आणि त्याबरोबरच आनंदी जगण्याची कलादेखील माहीत असायला हवी.
  • प्रत्येकाला स्वतंत्र आणि प्रेमळ वातावरण मिळाले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या अहंकाराने कुटुंब चालवता कामा नये. तर प्रत्येकाची काळजी आणि प्रत्येकाबद्दल स्नेह हा जगण्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे.
  • अशा प्रकारे वागल्याने इतरांशी आपण व्यवस्थित बोलूच शिवाय प्रत्येक कुटुंबीयाबद्दल स्वतःला आदर वाटेल. मग प्रत्येकाच्या वागण्याची आणि त्यांच्या विचारांची दखल घेतली जाईल आणि एकत्रितपणे समस्या सोडवल्या जातील.
  • असे केल्याने कुटुंबातील नाती फुलत जातील. कुटुंबाबद्दल कुतूहल वाटेल. आणि इतरांचा विषय किंवा कोण कसे काम करते, कोणी कसे वागले पाहिजे असे बिनबुडाचे प्रश्न आपण उठवणार नाही. नक्की समस्या काय आहे आणि त्यावर उपाय काय असू शकेल याची जाणीव सर्वांनाच होईल. सर्वजण एकत्र बसून चर्चा करतील आणि योग्य निर्णय घेतील.

तुम्हाला सुखी कुटुंबाचे रहस्य (इतरांबद्दल बोलताना) (Happy Family Relationship Secrets In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की कमेंट करा.

Leave a Comment